तरुण भारत

आर्थिक मंदीचा फटका जवानांनाही; थकले 2 महिन्यांचे भत्ते

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशातील आर्थिक मंदीचा फटका लष्करी जवानांनाही बसत आहे. आर्थिक मंदीमुळे निमलष्करी दलाच्या जवानांचे रेशन भत्ते रोखण्यात आले आहेत. मागील चार महिन्यातील ही दुसरी वेळ आहे.

Advertisements

देशातील आर्थिक मंदीचा फटका उद्योजक, नोकरदार, आणि व्यापाऱयांना बसत असताना देशाच्या सीमारेषेवर आपले कर्तव्य बजावणाऱया लष्करी जवानांनाही या मंदीचा सामना करावा लागत आहे. मागील वषी सप्टेंबर महिन्यात सीआरपीएफच्या 3 लाख जवानांचा 3600 रुपयांचा रेशन भत्ता थांबविण्यात आला होता. माध्यमातून हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये हे भत्ते देण्यात आले.

त्यानंतर आता पुन्हा निमलष्करी दलातील 90 हजार जवानांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील भत्ता मिळाला नाही. सैन्य दलातील जवानांना मिळणारा चाईल्ड एज्युकेशन भत्ताही देण्यात आला नाही. निमलष्करी दलातील जवानांना 2 महिन्यांचे वेतन देण्यासाठी पैसे नसल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाने सरकारला दिल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

राज्यात पावसाचा जोर वाढणार

datta jadhav

वारणा दूध संघामार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम 

Abhijeet Shinde

कोरोना : महाराष्ट्रात मागील 24 तासात 47,228 नवे रुग्ण; 155 मृत्यू

Rohan_P

”…म्हणून मेलेलं काँग्रेसवाले जिवंत झाले”

Abhijeet Shinde

आता अशा बऱयाच बातम्या मिळतील : चंद्रकांत पाटील

prashant_c

सहकारी बँका, कारखाने या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल चालवण्याची परवानगी द्या : रोहित पवार

prashant_c
error: Content is protected !!