तरुण भारत

नाशिक : रिक्षाला धडक देऊन एसटी बस विहिरीत, 7 ठार

ऑनलाईन टीम / नाशिक : 

नाशिक जिह्यातील देवळा तालुक्यात एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे. कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली असून, त्यात 7 जण ठार झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  तर 30 ते 35 प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisements

उमराणा-देवळा रस्त्यावर एसटी बसचा टायर फुटला आणि बसने रिक्षाला धडक दिली. त्यानंतर एसटी बस रिक्षासह विहिरीचा कठडा तोडून विहिरीमध्ये कोसळली. एसटी बस मालेगाववरुन कळवण येथे जात होती. एसटी बसमधून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

 

Related Stories

सोलापूर विद्यापीठात सुरु होणार ‘एम ए योगा’ अभ्यासक्रम

triratna

सोलापूर ग्रामीणमध्ये १७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, ७ जणांचा मृत्यू

triratna

सोलापूर : लोकप्रतिनिधी गप्प कसे ? कुठे आहेत लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री

triratna

कर्नाटक : सहाय्यकाने घेतलेल्या खंडणीबाबत माहिती नाही: मंत्री श्रीरामुलू

Shankar_P

कुर्डुवाडी परिसरात मुसळधार पावसाने काही काळ वाहतूक खोळंबली

triratna

गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत आईसह दोन मुलांचा मृत्यू

Shankar_P
error: Content is protected !!