25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

सीआरपीएफच्या सुरक्षा यंत्रणेत सुधारणा

श्रीनगर

 पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यानंतर काश्मीर खोऱयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात सीआरपीएफने स्वतःच्या व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. सिक्युरिटी ड्रिलमधील त्रुटी दूर करण्यात आल्या असून सीआरपीएफचे दिशादर्शन तंत्रज्ञान बदलण्यात आले आहे.

दहशतवाद्यांची वारंवार बदलणारी कार्यपद्धत पाहता सीआरपीएफही खोऱयातील स्वतःची व्यूहनीती बदलत आहे. याच कारणामुळे नव्या वर्षात 17 दहशतवादी मारले गेल्याचे उद्गार सीआरपीएफचे महासंचालक ए.पी. माहेश्वरी यांनी काढले आहेत.

विदा सुरक्षा

कलम 370 हद्दपार झाल्यावर सीआरपीएफच्या बदललेल्या रणनीतित सायबर वॉरफेअर महत्त्वाचा हिस्सा आहे. पुढील युद्ध सायबर जगतातील राहणार असल्याने सीआरपीएफने विदा सुरक्षेवर भर दिला आहे. सीआरपीएफने विविध ठिकाणी ग्रोथ सेंटर निर्माण केले असून तेथे जवानांना सायबर सुरक्षेशी संबंधित प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.

विशेष प्रशिक्षण

सीआरपीएफ सायबर वॉरफेअरला ठोस प्रत्युत्तर देणार आहे. जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि ईशान्येत सीआरपीएफचे प्रमुख केंद्र असणार असून तेथेच सायबर वॉरफेअरचा सामना करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तज्ञांकडून प्रशिक्षण

सीआरपीएफच्या प्रशिक्षणात जागतिक स्तराचे सायबर क्राईम तज्ञ सामील हेणार आहेत. सायबर युद्धात सर्वसामान्यांचे सहकार्य प्राप्त होईल अशा प्रकारचे मॉडय़ुल तयार केले जात आहे. सायबर वॉयफेअर सेंटरमध्ये सर्वसामान्यांना समाजमाध्यमांद्वारे देशातील सर्वात मोठय़ा अंतर्गत सुरक्षा दलाला माहिती देण्याची तसेच सूचना करण्याची सुविधा प्राप्त होणार आहे.

Related Stories

येत्या आर्थिक वर्षात ११ टक्के विकासदर

Patil_p

ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱया स्थानी

Patil_p

स्कुटरवर चालते-फिरते वाचनालय

Patil_p

प्रथम तरुणांना लस द्या : खा. मल्लिकार्जून खर्गें

triratna

प्यार का चक्कर बाबू भैया!

Patil_p

विदेशातून दाखल होणाऱयांसाठी दिशानिर्देश

Patil_p
error: Content is protected !!