तरुण भारत

झिंबाब्वेच्या पहिल्या डावात 406 धावा

वृत्तसंस्था/ हरारे

हरारे स्पोर्टटस् क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीतील मंगळवारी खेळाच्या दुसऱया दिवशी यजमान झिंबाब्वेने पहिल्या डावात 406 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने दिवसअखेर पहिल्या डावात 2 बाद 112 धावा केल्या.

या सामन्यात झिंबाब्वेने 6 बाद 352 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचे शेवटचे चार गडी 54 धावांची भर घालत तंबूत परतले. झिंबाब्वेचा पहिला डाव 115.3 षटकांत 406 धावावर समाप्त झाला. झिंबाब्वेच्या डावात कर्णधार विलीयम्सने 137 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 107, सिकंदर रझाने 99 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 72, टेलरने 62 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 62, केसुझाने 4 चौकारांसह 38, मुटोमबोझीने 4 चौकारांसह 33, चेकबेव्हाने 3 चौकारांसह 31 धावा जमविल्या. लंकेतर्फे इंबुलडेनियाने 182 धावांत 4, डिसिल्वाने 71 धावांत 3, लकमलने 37 धावांत 2 गडी बाद केले.

लंकेच्या डावाला चांगली सुरूवात झाली. कर्णधार करूणारत्ने आणि ओ फर्नांडो यांनी सलामीच्या गडय़ासाठी 94 धावांची भागिदारी केली. करूणारत्ने 3 चौकारांसह 44 तर फर्नांडोने 4 चौकारांसह 44 धावा जमविल्या. मेंडीस 12 धावांवर खेळत आहे. झिंबाब्वेतर्फे सिकंदर रझा आणि टिरेपेनो यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

झिंबाब्वे प.डाव- सर्वबाद 406 (विलीयम्स 107, सिकंदर रझा 72, टेलर 62, केसुझा 38, चेकाबेव्हा 31, इंबुलडेनिया 4-182, डिसिल्वा 3-71, लकमल 2-37, कुमारा 1-60), श्रीलंका प. डाव- 44.2 षटकांत 2 बाद 110 (करूणारत्ने 44, ओ फर्नांडो 44, मेंडीस खेळत आहे 12, सिकंदर रझा, टिरपेनो प्रत्येकी 1 बळी).

Related Stories

कार्लसन ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Patil_p

नागलचा पहिल्याच सामन्यात पराभव

Patil_p

5 नोव्हेंबरचे भारतीय क्रिकेटशी अनोखे नाते!

Patil_p

अर्जुन पुरस्कारासाठी संदेश झिंगन, बाला देवी यांची शिफारस

Patil_p

अंशू, सोनम मलिकचे ऑलिम्पिक तिकीट निश्चित

Patil_p

भारत-द. आफ्रिका महिलांच्या टी-20 मालिकेला आज प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!