तरुण भारत

किटल आळारे आजोबा देवाचा आज पिंडिकोत्सव

प्रतिनिधी/ कुंकळ्ळी

आळारे तळप, किटल, केपे येथील श्री आळारे आजोबा देवाचा वार्षिक पिंडिकोत्सव आज बुधवार 29 रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे.

Advertisements

या उत्सवाचे यंदाचे खास आकर्षण रात्री 8 वा. होणार असलेला महाराष्ट्राची रसाळ परंपरा आणि धगधगता इतिहास मांडणारा राजमुद्रा, मुंबई निर्मित ‘दि ग्रेट मराठा’ हा बहारदार कार्यक्रम व सोबतीला सिनेसृष्टीतील कॉमेडी स्टार माधव मोघे यांचा कार्यक्रम हे राहणार आहे. यंदा हा उत्सव उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर व त्यांचे बंधू बाबल कवळेकर यांचे वडील राघू भिरू कवळेकर यांच्या सौजन्याने होत आहे.

श्री शांतादुर्गा किटलकरीण संस्थानचे पूरव असलेल्या श्री आळारे आजोबा हे दैवत भक्तांचा आधार, वाटसरूंचा तारणहार, संकटप्रसंगी धावून येणारे जागृत दैवत म्हणून ओळखले जाते. श्री शांतादुर्गा किटलकरीण संस्थानचे अध्यक्ष उदय ना. देसाई, चिटणीस पंकज ना. देसाई, खजिनदार सोनल ना. देसाई, मुखत्यार गौरेश ना. देसाई, सदस्य योगेश ना. देसाई व रत्नाकर रा. देसाई हे उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत.

या उत्सवाच्या दरम्यान सकाळपासून यजमानांस प्रायश्चित, देवता प्रार्थना, महागणपतीपूजन, श्रींस द्वादशकलशार्चनपूर्वक महाभिषेक, देवता स्थापना, नवग्रहपूजन, हवन, पूर्णाहुती व महाप्रसाद होईल. दुपारी व रात्री महानैवेद्य होणार असून भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन श्रींच्या कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी समिती व यजमानांतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

गोमंतक गौड मराठा समाजाच्या आदिवासी भवनाचा 13 रोजी पायाभरणी सोहळा

Omkar B

आयआयटी प्रकल्पामुळे सरकारला जमीन मालकी समस्येची जाण.

Patil_p

विनोद सावंत यांनी सात वर्षांत 1600 सांपाना दिले जिवदान

Amit Kulkarni

पंतप्रधानांकडून श्रीपाद नाईक यांची फोनवरुन विचारपूस

Amit Kulkarni

शेतकऱयांच्या ‘भारत बंद’ला विरोधकांचा पाठिंबा

Patil_p

खर्रेवाडे सुकुर वेताळ देवस्थानचा 4 रोजी वर्धापनदिन

Amit Kulkarni
error: Content is protected !!