तरुण भारत

नीरज चोप्रा : 87.86 मीटर भालाफेक करत पटकावले ऑलिम्पिकचे तिकीट

 ऑनलाईन टीम / मुंबई :

नीरज चोप्राने पुन्हा एका दुखापतीतून सावरत कमबॅक केले आहे. नुकत्याच दक्षिण अफ्रिकेत पार पडलेल्या सेंट्रल नॉर्थ इस्ट स्पर्धेत त्याने 87.86 मीटर भालाफेक करत 2020 मधील ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले आहे.

Advertisements

 ऑगस्ट 2018 मध्ये त्याने आशियाई स्पर्धेत 88.06 मीटर भालाफेक करून राष्ट्रीय विक्रमासह  सुवर्ण जिंकले होते. 2019 मध्ये झालेल्या दुखापतीनंतर नीरज चोप्राला बराच काळ स्पर्धेपासून दूर रहावे लागले होते. त्यानंतर त्याने दुखापतीतून सावरत कमबॅक केले आहे.

नीरज याने याबाबत एक ट्विट केले आहे. त्यामध्ये तो म्हणतो, ‘दुखापतीतून् सावरत सराव स्पर्धा म्हणून सेंट्रल नॉर्थ इस्ट स्पर्धेत दाखल झालो. पहिल्या तीन थ्रोमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर चौथ्या प्रयत्नात आणखी दूर भालाफेक करण्याचे मी ठरवले आणि ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले. या कामगिरीबद्दल मी आनंदी आहे.’

Related Stories

महान हॉकीपटू बलबीर सिंग सिनियर कालवश

Patil_p

70 टक्के जपानी लोकांना ऑलिम्पिक नको – सर्व्हेतून निष्कर्ष

Patil_p

वाद नाहीत, याचाच अर्थ असा की, वाद आहेत!

Amit Kulkarni

दिल्ली कॅपिटल्सचे अग्रस्थान राखण्यावर लक्ष

Patil_p

भारतात सध्या फक्त मोदी लिपी : राज ठाकरे

prashant_c

अँड्रीस्क्यू, शापोव्हॅलोव्ह, जोकोविच यांची आगेकूच

Patil_p
error: Content is protected !!