तरुण भारत

केरळ विधानसभेत अभिभाषणापूर्वी गोंधळ

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

केरळ विधानसभेत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या अभिभाषणापूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच एनआरसीच्या मुद्दय़ावर बुधवारी गोंधळ झाला आहे. विरोधी पक्ष युनायटेड डेमोक्रेटिक पंटच्या आमदारांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच फलकही झळकविले आहेत.

Advertisements

केरळ विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले आहे. राज्यपाल अभिभाषणासाठी सभागृहात पोहोचले असता युडीएफ आमदारांनी त्यांचा मार्ग रोखला. कायद्याच्या विरोधातील मजकूर वाचावा अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्यानेच तो वाचत आहे. पण आमच्या धोरणांमध्ये हा मुद्दा सामील नसल्याचे माझे मानणे आहे. राज्य सरकारच्या इच्छेचा आदर करत हा मजकूर वाचत असल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे.

काँग्रेसचा आरोप

राज्यपाल भाजपच्या प्रदेशाध्यक्षांप्रमाणे काम करत आहेत. सत्तारुढ माकप आणि राज्यपाल यांच्यात पडद्याामागे संगनमत झाले आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे भ्रष्टाचारात सामील असून चालू आठवडय़ात याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्री केंद्राला साथ देत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते चेन्निथला यांनी केला आहे.

Related Stories

देशात 2.99 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

दिल्लीत 6,842 नवे कोरोना रुग्ण; 51 मृत्यू

Rohan_P

तिबेटच्या नव्या ‘सिक्योंग’ने घेतली शपथ

Amit Kulkarni

दिल्लीतील मशिदीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मौलाना अटकेत

Abhijeet Shinde

जम्मू-काश्मीरमध्ये एका दिवसात 162 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 1922 वर

Rohan_P

कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरतोय इन्फ्राफंड

Patil_p
error: Content is protected !!