तरुण भारत

फोन पे वरुन साठ हजाराला गंडा

प्रतिनिधी/ सातारा

येथील प्रतापगंज पेठेतील एकाला फोन करुन फोन पे वरुन पैसे ट्रान्सफर करा, असे सांगून मोबाईलचा एनीडेस्क ऍप्लीकेशनचा कोड घेवून अज्ञाताने 60 हजार 499 रुपयाला गंडा घातला. याप्रकरणी रोहित चंद्रहार निकम (वय 26, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) याने शाहुपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Advertisements

  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहित निकम यांना दि. 25 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक निनावी फोन आला. त्यामध्ये समोरील व्यक्तीने राहत ऍनिमल फाऊंडेशनमधून बोलत असल्याचे सांगून प्राण्यांच्या सुश्रुषेसाठी 10 रुपये फोन पे किंवा गुगल पे वरुन ट्रान्सफर करावे लागतील असे सांगितले. त्यांनंतर फोनवरील अज्ञात व्यक्तीने रोहित निकम यांना त्यांच्या मोबाईलचा एनीडेस्क ऍप्लीकेशनचा कोड मागून घेवून पेटीएम वॉलेटवर तीन ट्रान्झेक्शन करुन रोहित निकम याच्या युनियन बँक ऑफ इंडिया, राधिका रोड शाखेतील खात्यातून 60 हजार 499 रुपये ट्रान्सफर करुन घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रोहीत निकम यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ए. व्ही. तावरे करीत आहेत.

 

Related Stories

सातारा : कोरोनालस उपलब्ध होईपर्यंत लसीकरण बंद राहणार

Abhijeet Shinde

जिल्हा परिषद आहे की धर्मशाळा

Patil_p

ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

datta jadhav

अवकाळी पावसाने रस्त्यावर मातीचे लोट

Patil_p

मच्छी मार्केटमधील कचरा ओढय़ात टाकणाऱया विक्रेत्यांवर होणार दंडात्मक कारवाई

Patil_p

सातारा : कोरोना नियम उल्लंघन हॉटेल मालकास पडले महागात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!