तरुण भारत

शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास सरकार स्थापनेला अडचण नाही : सुधीर मुनगंटीवार

ऑनलाईन टीम / नांदेड : 

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सुरळीत चालले असताना भाजप पुन्हा सत्ता स्थापनेबाबत आशावादी असल्याचे दिसत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तसं वक्तव्य केले आहे.

Advertisements

‘शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप आजही सत्तास्थापनेसाठी तयार आहे,’ असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. नांदेडमध्यश एका विवाहसोहळय़ाला मुनगंटीवार उपस्थित राहिले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ते म्हणाले, शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यांनी आताही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही. देर आए दुरुस्त आए, सुबह का भुला श्याम को आया, असं आम्ही समजू. तसेच मनसेला सोबत घेण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

Related Stories

भारतात मागील 24 तासात 76,472 नवे कोरोना रुग्ण, 1021 मृत्यू

datta jadhav

महाराष्ट्र : आतापर्यंत 25,701 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

‘कोरोनो’चा भारतातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण केरळमध्ये

prashant_c

कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील – विजय वडेट्टीवार

triratna

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी

Shankar_P

ऍपल ऑनलाईन आयफोन खरेदीवर आता येणार मर्यादा

tarunbharat
error: Content is protected !!