तरुण भारत

1 फेब्रुवारीपासून गोमंतकीयांना कॅसिनो मध्ये जाण्यास बंदी

राज्यातील मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनो मध्ये जाण्यास येत्या दिनांक 1 फेब्रुवारीपासून गोमंतकीयांना बंदी असेल सरकारने गेमिंग कमिशन स्थापन करण्याचे ठरवले आहे त्या विषयीचे अंमलबजावणी येत्या शनिवारपासून सुरू होणार आहे. मांडवी नदीत पाच कॅसिनो आहेत जहाजं मधील कॅसिनो मध्ये देशविदेशातील पर्यटक जातात व कॅसिनो जुगार खेळतात त्याचबरोबर हजारो गोमंतकीयांना हि कॅसिनो चे व्यसन लागले आहे अनेक गोमंतकीय कुटुंबे पैसे से उध्वस्त होत आहेत या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांना कॅसिनो मध्ये जाण्यास बंदी लागू करावी अशी मागणी आमदार व काही मंत्र्यांकडून सातत्याने केली जात होती कळंगुट मतदारसंघाचे आमदार तथा बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय उपस्थित केला होता गोमंतकीयांना कैसे मध्ये जाण्यास बंदी लागू करायला हवी अशी मागणी त्यांनी केली होती मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते गोवा विधानसभेत 2019 आली याविषयी आश्वासन दिले गेले होते पण त्याची पूर्तता कधी झाली नव्हती. कॅसिनोवर रोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते मांडवी नदीतून कॅसिनो हटवले जावेत अशी मागणी काही आमदार करत आहेत मात्र सरकार तूर्त गोमंतकीयांना बंदी लागू करण्याच्या विषयावर लक्ष देईल असे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी अधिकृत घोषणा केली गोव्याचे वाणिज्य कर आयुक्त हेच गेमिंग कमिशनर म्हणून काम पाहतील आपण त्याविषयीच्या फाईलवर प्रक्रिया सुरू केली आहे गोमंतकीयांना कॅसिनो मध्ये जाण्यापासून बंदी लागू होईल दिनांक एक फेब्रुवारीपासून बंदीची अंमलबजावणी कमिशनर करून घेतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले कॅसिनो मध्ये कोणी जातील त्यांचे ओळखपत्र मागण्याचा अधिकार हा गेमिंग कमिशनरला असेल मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

दहा हजार वाहनचालकांना वाहतूक करमाफीचा लाभ

Omkar B

पालिका मंडळांचा कार्यकाळ महिनाभरात येणार संपुष्टात

Omkar B

राजकारणात 50 वर्षे पूर्ण, आता थांबण्याची गरज

Amit Kulkarni

कार्यकर्त्यांमधून आलेल्या नावांतूनच उमेदवार निवडू

Amit Kulkarni

गोमंतकतर्फे शिवजयंती मिरवणूक धुमधडाक्यात साजरी

Amit Kulkarni

तिवरे भागात भातशेतीची कापणी व मळणी सुरु

Omkar B
error: Content is protected !!