तरुण भारत

कृष्णपंक्ती नाहीं उणें

जेवणात वाढलेल्या पदार्थांच्या प्रकाराची एक सुंदर वर्गवारी एकनाथ महाराज देतात. या पंक्तीत कोणकोणत्या प्रकारचे पदार्थ वाढले होते. लेह्य, पेय, चोष्य, खाद्य, भक्ष्य व भोज्य असे सहा प्रकारचे पदार्थ होते. जीभेने चाटले जातात त्यांना लेह्य पदार्थ म्हणतात, जसे लोणचे, जाम, मुरांबा वगैरे. घटघटून जे पितात ते पेय पदार्थ, जसे बासुंदी, आंबरस, सरबत, पाणी वगैरे. रस चोखून घेतात व नंतर उरलेला चोथा टाकून देतात ते चोष्य जसे शेवग्याच्या शेंगा, आंबा चोखून बाठ व साल टाकणे. अग्नी, पाणी व मीठ यांच्या संपर्काशिवाय खातात ते खाद्य जशी फळे. दूध, भात, रोटी, पोळी, भाकरी, पक्वान्ने असे इतर सर्व खाद्य पदार्थ हे भोज्य समजावे. हे सर्व प्रकारचे पदार्थ वाढल्यानंतर वाढायचे काय राहिले? जसा कृष्ण परमात्म्याच्या स्वादाने सर्व जीवनात गोडी येते त्याप्रमाणे सर्व पदार्थांना रुचकर बनवणारे मीठ शेवटी वाढले.

नाहीं श्रद्धेची जया भूक । आंगीं अश्रद्धेचें असुख ।

Advertisements

गोड तेंचि म्हणति विख । थुंकोनि देख सांडिती ।

कृष्णपंक्तीची आवडी । श्रद्धाक्षुधा जया गाढी ।

ग्रासोग्रासी अधिक गोडी । हे परवडी त्यालागी ।

कृष्णपंक्ती नाहीं उणें । जेवितां जेविते जाणती खुणे ।

रुचलेपणें वाढिती जाणें । सावध म्हणे शुद्धमती ।

कृष्ण देखोनियां डोळा । जीवा जीवन देती चपळा ।

चतुर्विध सुपरिमळा । येळा वाळा उदादि ।

चतुर्विधा चारी मुक्ती । शुद्धमती पुढें राबती ।

जें जें पाहिजे जिये पंक्ती । तें तें देती ठायी ।

पहिलें वाढिलें तवजणीं । पूर्ण करिती चौघीजणीं ।

एका जनार्दन भोजनीं । अतृप्त कोणी राहो नेदी ।

ज्यांना श्रद्धेची भूक नाही आणि जे अश्रद्धेत बुडाले आहेत, तेच गोड स्वादिष्ट पदार्थांनाही विष म्हणून थुंकून टाकतात. ज्यांना श्रद्धारूपी भूक लागली आहे त्यांनाच कृष्णपंक्तीची आवड आहे. अशा भाविकांना या पंक्तीतील प्रत्येक घास अधिकच गोड लागत होता. कृष्णपंक्तीत काही उणे राहू नये याची काळजी स्वतः राणी शुद्धमती घेत होती. जीवाचे जीवन असलेला कृष्ण डोळय़ांनी पाहिल्याने ज्याला जी मुक्ती हवी ती त्याला लाभत होती. कोणीही अतृप्त राहत नव्हता.

शुद्धमतीने सगळे । न फोडितां रांधिले कोहळे ।

चवी आले सोहंमेळें । स्वाद गोपाळें जाणिजे ।

धालेपणाचे ढेंकर । स्वानंदे देती जेवणार ।

गोडी नीत नवी अपार । कृष्णदातार जे पंक्ती ।

स्वाद घेतला जेवणारें । जेवितां कोणी न म्हणे पुरे ।

गोडी घेतली शार्ङ्गधरें । भाग्यें उदार शुद्धमती ।

सावध शुद्धमती वाढी । यादवां तृप्ती झाली गाढी ।

ब्राह्मणांची शेंडी तडतडी । धोत्रें बुडीं ढिलविती ।

भीमक करताहे विनंती । अवघ्यां झाली परम तृप्ती।

उष्टावणलागी श्रीपती । ठायीं ठेविती निजमुद्रा ।

Related Stories

पश्चिम बंगालमध्ये काय होणार ?

Amit Kulkarni

कोरोना काळात कवींची भीती

Patil_p

सहिष्णू भाषा

Patil_p

सर्वसाक्षी

Patil_p

ताण-तणावाचा सामना करताना…

Patil_p

कोरोनानंतरच्या वेगळ्या वाटा

Patil_p
error: Content is protected !!