तरुण भारत

आसाममध्ये 1616 उग्रवाद्यांचे आत्मसमर्पण

गुवाहाटी / वृत्तसंस्था :

आसाममधील प्रतिबंधित उग्रवादी संघटना नॅशनल डेमोक्रेटिक प्रंट ऑफ बोडोलँडच्या (एनडीएफबी) सर्व चार गटांच्या 1616 उग्रवाद्यांनी गुरुवारी आत्मसमर्पण केले आहे. उग्रवाद्यांनी 178 शस्त्रास्त्रs तसेच स्फोटकेही जमा केली आहेत. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि अर्थमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या उपस्थितीत उग्रवाद्यांनी शस्त्रs खाली ठेवली आहेत. बोडो करारातील बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रतिबद्ध असून आसामला ईशान्येतील सर्वोत्तम राज्य केले जाणार असल्याचे सोनोवाल यांनी म्हटले आहे. 23 रोजी 8 प्रतिबंधित संघटनांच्या 644 उग्रवाद्यांनी शस्त्रs खाली ठेवली होती.

Advertisements

एनडीएफबीने केंद्र तसेच राज्य सरकारसोबत त्रिपक्षीय करार केला आहे. करारानुसार एनडीएफबी म्होरक्या बी. साओराईगवरा समवेत सर्व उग्रवादी हिंसक  कारवाया थांबवून सरकारसात शांतता चर्चेत सामील होतील. पुढील 3 वर्षांपर्यंत बोडोलँड क्षेत्राच्या विकासासाठी 1500 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज दिले जाणार आहे. तसेच संबंधित क्षेत्रात केंद्रीय विद्यापीठासह अनेक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.

27 वर्षांनी तिसरा करार

हा करार मागील 27 वर्षांमध्ये झालेला तिसरा करार होता. ऑल बोडो स्टुडंट्स युनियन आणि बोडो पीपल्स ऍक्शन कमिटी यांच्यात 1993 मध्ये पहिला तर 2003 मध्ये दुसऱया करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. या कराराच्या माध्यमातून बोडोलँड पार्टनरशिप कौन्सिल (बीटीसी) स्थापन करण्यात आले. बीटीसीत आसामचे 4 जिल्हे सामील आहेत. नवा करार बीटीसी क्षेत्रात राहणाऱया बिगरबोडो-लोकांच्या हितांना धक्का पोहोचविणार नसल्याचे आश्वासन आसाम सरकारने दिले आहे.

शांततेला चालना

युनायटेड लिबरेशन प्रंट ऑफ आसाम (उल्फा), नॅशनल डेमोक्रेटिक प्रंट ऑफ इंडिया (एनडीएफबी), आरएनएलएफ, केएलओ, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी), नॅशनल संथाल लिबरेशन आर्मी (एनएसएलए), आदिवासी ड्रगन फायटर (एडीएफ) आणि नॅशनल लिबरेशन प्रंट ऑफ बंगाली (एनएलएफबी) च्या उग्रवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

उल्फाला चर्चेचे निमंत्रण

उल्फा-आय या उग्रवादी संघटनेचा म्होरक्या परेश बरुआला आसाम सरकारकडून चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे. आसाम आणि ईशान्येतील हिंसक कारवायांमध्ये सामील या संघटनेने प्रजासत्ताक दिनी दिब्रूगडमध्ये तीन ठिकाणी स्फोट घडवून आणले होते.

35 उग्रवादी संघटना सक्रीय

स्वातंत्र्यापासूनच आसाम समवेत ईशान्येत उग्रवादाची समस्या राहिली आहे. आसामच्या लोकसंख्येत बोडोंचे प्रमाण 28 टक्के आहे. बोडो स्वतःला आसामचे मूळ निवासी आहेत. अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या हिस्स्याला बोडोलँड घोषित करण्याची त्यांची मागणी आहे. परप्रांतीय दाखल झाल्याने बोडो समुदायाची उपजीविका आणि संस्कृतीवर प्रभाव पडला आहे. बोडो उग्रवाद्यांची संघटना एनडीएनबीचा एक गट हिंसाचार फैलावत आहे. एनडीएफबीचा एक गट आदिवासी आणि मुस्लिमांपासून बोडो समुदायाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र राज्य इच्छितो. आसाममध्ये उल्फा, एनडीएफबी समवेत 35 हून अधिक उग्रवादी संघटना सक्रीय आहेत.

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 512 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

तणावावर चर्चेची मात्रा

Patil_p

…तर मोदी सरकार तुम्हाला देईल पाच हजारांचे बक्षीस

datta jadhav

मंत्रिमंडळ विस्तारासाठी हायकमांडच्या सूचनेची प्रतीक्षा

Patil_p

एका जिल्हय़ाची धान्य आत्मनिर्भरता

Patil_p

संसदेचे पावसाळी अधिवेशन ‘या’ तारखेपासून होणार सुरु

Abhijeet Shinde
error: Content is protected !!