तरुण भारत

शिरगाववासीयांची पाण्याची बिले जिल्हा खनिज निधीतून भरण्याचा प्रस्ताव

 डिचोली/प्रतिनिधी :

  शिरगाव गावातील लोकांच्या थकून राहिलेल्या पाणी बिलांच्या विषयावर डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत तीनही कंपन्यांच्या अधिकाऱयांनी पाणी बिले भरण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर नळांची बिले जिल्हा खनिज निधीतून भरण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपन्या नळांची बिलकुल भरण्यास राजी नसल्यास आता सरकारने या लोकांच्या पाण्याच्या व्यवस्थेची जबाबदारी स्विकारावी, अशी मागणी करण्यात आली.

    डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, मामलेदार प्रवीणजय पंडित, पोलीस निरिक्षक संजय दळवी, सेसा कंपनीचे व्यवस्थापक संतोष मांदेकर, कामिलो फर्ना??डिस, चौगुले कंपनीचे दुर्गेश शिसनी, बांदेकर खाण कंपनीचे खासीमपिरन, शिरगावचे सरपंच सदानंद गावकर, गणेश गालकर, अजय गावकर ,अमीत गावकर व इतरांची उपस्थिती होती.

    बैठक सुरू होताच तीनही कंपन्यांच्या अधिकाऱयांना शिरगावातील लोकांची पाणी बिले भरण्यासंबंधी प्रश्न विचारला असता अधिकाऱयांनी नकारार्थी उत्तर दिले. खाणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खाण व्याप्त भागातील लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी नफ्यातील ठरवून दिलेल्या टक्केवारीतील रक्कम राज्य सरकारच्या जिल्हा खनिज निधीत भरलेली आहे. सध्या खाणी बंद असल्याने सदर पैसे भरणे कंपन्यांना शक्मय नसल्याचे खाण कंपनीच्या अधिकाऱयांनी सांगितले. यावेळी गणेश गावकर यांनी या विषयावर सविस्तर माहिती दिली.

जिल्हा खनिज निधीतून बिल भरण्याचा प्रस्ताव.

    या विषयावर डिचोली उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, पोलीस निरीक्षक संजय दळवी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यासह जिल्हाधिकारी विवेक परब यांनी संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली होती. या बैठकीत खाण कंपन्या सदर बिल भरण्यास असमर्थता दाखवत असल्यास या बिलांचा विषय जिल्हा खनिज निधीकडे नेण्यात येण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार सध्या या पाण्याच्या बिलांच्या मूळ रक्कमेवर वाढलेली थकबाकी खात्याकडून माफ करण्यात यावी व मूळ बिलांची रक्कम जिल्हा खनिज निधीतून भरून घेण्यात यावा. असा प्रस्ताव सरकारदरबारी सादर करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तोपर्यंत शिरगावातील कोणत्याही घराचे नत्र कनेक्शन तोडण्यात येणार नाही. याची हमी उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी घेतली.

विषयांतर झाल्याने चर्चा फिस्कटली

    पाण्याच्या बिलंचा विषय सुरू असतानाच मध्येच खाण भागात ई लिलावाचा माल वाहून नेताना नासधूस करण्यात आलेल्या झाडांचा विषय शिरगावातील स्थानिकांनी निर्माण केल्याने मामलेदार व स्थानिक युवकांमध्ये शाब्दीक चकमक झाली. परिणामी उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी मूळ विफय सोडून भलताच विषय निर्माण करायचा असल्यास आपल्यालाही कोणतीही चर्चा करायची नाही, असे म्हणत कार्यालय सोडले. त्यामुळे सदर बैठक अर्ध्यावरच फिस्कटली. या विषयावर पुढे चर्चा होऊ शकली नाही.

Related Stories

भिरोंडा नदीत डिचोली येथील तरुण बुडाला

Omkar B

मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याच्या अफवेने पळापळ.

tarunbharat

आसगाव येथे अज्ञाताकडून साईबाबांच्या घुमटीची मोडतोड

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांनी आधी नेहरू समजून घ्यावेत

Patil_p

डॉ. विशाल च्यारीची आत्महत्त्या नव्हे घातपात

Patil_p

भल्या पहाटे कोलव्यात कार घरात घुसली

Amit Kulkarni
error: Content is protected !!