तरुण भारत

हजरत सैय्यद कादरशाबाबा दर्गाह शरीफ यांच्या शाही ऊरुस

वार्ताहर/ म्हसवड

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक संबोधले जात असलेले दहिवडी ता.माण येथील प्रसिध्द हजरत सैय्यद कादरशाबाबा दर्गाह शरीफ यांचा 23 वा उरूस मंगळवार (दि.4)ते शुकवार (दि.7)दरम्यान मोठय़ा उत्साहात साजरा होत आहे.या निमित्त दर्गाह व परिसरात विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अँड.महेश वसव यांनी दिली.

Advertisements

कार्यक्रम मंगळवारी( दि.4) सायंकाळी सात वाजता चंद्रकांत शंकरराव वसव यांचे निवास स्थानाहून संदल, झेंडा, चादर यांची मिरवणूक दहिवडी शहराच्या मुख्य रस्त्याने दर्गाह शरीफ येथे रात्री आठ वाजता पोहोचेल. त्यानंतर दर्गाह मधील दुर्बतवर धार्मिक विधीपुर्वक संदल, फूल, चादर चडविली जाईल व महाप्रसाद होईल. रात्री दहा वाजता ’मिलाद शरीफ’ चा कार्यक्रम होईल.

बुधवारी ऊरुर्साचा मुख्य दिवस आहे. त्या दिवशी दर्गाह सर्व जाती-धर्मातील भाविक भक्तांना दर्शनास खुले राहील. सायंकाळी सहा  ते आठ वाजता गायक (व्हाईस ऑफ महेंद्र कपूर ) शशिकांत यांचा सदाबहार हिंदी मराठी फिल्मी गीत आणि कव्वाली गाण्यांचा मनोरंजन शानदार कार्यक्रम होणार आहे.  

रात्री आठ वाजता बारामती येथील प्राचार्य कोतमिरे यांचे प्रवचन होणार आहे.

त्यानंर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम व  रात्री नऊ वाजता बारामती येथील प्रसिद्ध कव्वाल जनाब समीर कादरी, जनाब अस्लम कव्वाल यांचा कव्वालीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

गुरुवार रोजी बाबांची शाही झेंडा मिरवणूक दुपारी तीन वाजता दर्गाह शरीफ मधून निघेल. या मिरवणुकीत 

विविध नामांकित बँड, बेंजो, झांज पथक, हलगी पथक, गजी पथके सहभागी होणार आहेत याबरोबरच प्रसिद्ध रातब, दांडपट्टा, घोडे व इतर आकर्षक देखाव्याचाही सहभाग राहिल.

हि शाही मिरवणूक दहिवडी शहराचे मुख्य रस्त्याने रात्री आठ वाजता दर्गाह शरीफ मध्ये  पोहोचेल त्यानंतर रात्री आठ वाजता मिरवणुकीची सांगता केली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवारी दर्गाह मध्ये जियारत या धार्मिक विधीने या ’उरुस शरिफ’ महोत्सवाची सांगता केली जाणार आहे.

या कार्यक्रमास ग्रामस्थ, हिंदु व मुस्लिम समाज बांधव   भाविक भक्तांनी उपस्थित राहावे.असे आवाहन अँड.महेश वसव यांनी केले आहे.

 

Related Stories

कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

datta jadhav

सातारा मॅरेथॉनवर माणदेशी मोहर

Patil_p

पिंपळवाडी येथे युवकाचा खून

datta jadhav

दक्षता सप्ताह निमित्ताने लाच लुचपतचे पोलीस उपअधीक्षकांची भ्रष्टाचार विरोधी जनजागृती

Abhijeet Shinde

विकेंड लॉकडाऊनमध्ये शहरात सन्नाटा

Patil_p

साताऱयात बंद घरे फोडण्याचा प्रकार सुरुच

Patil_p
error: Content is protected !!