तरुण भारत

तिनही सरकारे भाजपचीच असतानाही म्हादईचा विषय झुलतच का ?

आमदार सुदिन ढवळीकर यांचा सवाल

       डिचोली/प्रतिनिधी

Advertisements

     आज केंद्रात, कर्नाटक राज्यात तसेच गोवा राज्यातही भाजपचीच सरकारे असूनही गोव्याच्या भविष्याचा आणि अस्तित्वाचा विषय असलेला म्हाद ई नदीचा विषय झुलतच का ठेवण्यात आलेला आहे ? असा सवाल आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील नद्या जोडण्याची भाषा करीत असताना येथे मात्र एक भाजपशासीत राज्य दुसऱया भाजपशासीत राज्याचीच नदी उलट दिशेने वळवून नेण्याच्या प्रयत्नात आहे. यावर केंद्रातील भाजप सरकार कोणतेही सहकार्य गोवा राज्याला देण्यास तयार नाही. म्हादई नदी जर कर्नाटक सरकारने त्यांच्या नियोजनाप्रमाणे वळवली तर राज्यातील म्हाद ई नदीचा फाटा म्हणून ओळखल्या जाणाऱया नद्यांच्या आधारावर कार्यान्वति असलेले राज्यातील मोठे जलशुद्धीकरण प्रकल्प बंद पडणार, अशी भिती आमदार सुदिन ढवळीकर यांनी डिचोली येथे व्यक्त केली.

     डिचोली मगो पक्षातर्फे डिचोलीतील मगोचे नेते तथा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नरेश सावळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या म्हादई बचाव जनजागृती अभियान पदयात्रेत आमदार सुदिन ढवळीकर बोलत होते. यावेळी मगो पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर, कार्याध्यक्ष एड. नारायण सावंत, माजी आमदार नरेश सावळ, पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, मधु गावकर व इतरांची उपस्थिती होती.

हा लढा मगोचा नसून गोवेकरांचा आहे.

    म्हाद ई नदी हि या राज्याची जिवनदायिनी असून या राज्यातील 12 पैकी 8 तालुक्मयांना या नदीचा सरळ सरळ संबंध येतो. या नदीचे पाणी कर्नाटक उलटय़ा दिशेने वळविण्यासाठी प्रयत्नरत असून कर्नाटकचे हे कारस्थान यशस्वी झाल्यास गोव्यासमोर भविष्यात पाण्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी मगो पक्षाने हा लढा उभारला आहे. त्यातून लोकांना म्हादई नदीचे या राज्यासाठी महत्व काय याबाबत जागृती केली जात आहे. हा लढा मगोच्या राजकारणासाठी नसून तो गोवेकरांच्या अस्तित्वासाठी उभारलेला लढा आहे. त्यात प्रत्येक गोवेकराने सामील होणे गरजेचे आहे. असे आवाहन आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.

(ँर्दे) म्हादई वाचविण्यासाठी आता केवळ सर्वोच्च न्यायालयच आधार.

   गोवा व कर्नाटक या राज्यांमध्ये निर्माण झालेल्या या विषयात केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीसुध्दा गोव्याला सहकार्य करू शकत नाही. कारण कर्नाटक राज्याकडून केंद्र सरकारला 28 खासदारांचे पाठवळ मिळते तर गोव्याकडे केवळ दोनच खासदार आहेत. त्यामुळे या विषयी आता केंद्र सरकारकडून सहकार्याची अपेक्षा ठेवणे गैर आहे. आता या विषयी गोव्याला केवळ सर्वोच्च न्यायालयाचाच आधार आहे. सर्वोच्च न्यायालयात म्हादई प्रश्नी दाखल केलेला विषय फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या सप्ताहात सुनावणीस येण्याची शक्मयता आहे. असे पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी सांगितले. यासाठी आता सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवताना राज्यात या विषयावर जागृती करावी लागणार तसेच सरकारवरही दबाव आणावा लागणार आहे.

म्हादई नदीमुळे वन्य जिवच नव्हे तर मानवी जिवनाही धोक्मयात येणार.

राज्याचे जल धोरण निश्चित करावे यासाठी माजी जलसंसाधन मंत्री विनोद पालेकर यांना मंत्री असताना पत्र लिहिण्यात आले होते. मात्र त्यावर काहीच विचार झाल नसल्याने राज्यासमोर आज पाण्यासाठी संकट उभे राहण्याची शक्मयता आहे. म्हाद ई नदी जर कर्नाटक राज्याने वळवली तर या नदीवर अवलंबून असलेल्या अभयारण्य तसेच पर्यावरणीय संवेदनशील भागांवर संक्रांत येणार आहेच. शिवाय म्हाद ईच्या उपनद्या म्हणून ओळखल्या जाणाऱया राज्यातील लहान मोठय़ा नद्यांतील पाण्याचा खारटपणा वाढणार. त्यामुळे वातावरणातील अर्दता वाढणार आणि गोडय़ा पाण्यामुळे मिळणारा थंडावा नष्ट होणार. अशा परिस्थितीत मानवी जिवनालाही भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्मयता आहे, असेही यावेळी राजेंद्र केरकर यांनी म्हटले.

लोकांनी जागृत होण्याची गरज

    म्हादईचा विषय आज गोव्यातील लोकांकडून जरी दुर्लक्षित केला गेला तरी हा विषय अत्यंत नाजुक आणि राज्याच्या अस्तित्वाशी संबंधित आहे. आज लोकांनी या विषयाचे गांभीर्य समजलेले नाही. त्यासाठीच मगो पक्षाने राज्यात म्हादई या विषयावर जागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या व या राज्याच्या भविष्याचा विचार करताना लोकांनी आज जागृत होण्याची गरज आहे. असे माजी आमदार नरेश सावळ यांनी म्हटले.

   पाण्यासाठी म्हादईवर कर्नाटक मोठा अन्याय करीत आहे. नदीचे पाणी वरून खाली यावे हा निसर्गाचा नियम आहे. मात्र हे पाणी उलटय़ा दिशेने वळवून नेणे याला काहिच अर्थ नाही. आणि या कार्यात कर्नाटकाला केंद्र सरकार सहकार्य करीत आहे. केंद्रीय वन खाते कर्नाटकला पत्र देतात आणि  पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपणाला माहित नसल्याचे म्हणून गोवेकरांची थट्टाच केली आहे. म्हादईचे पाणी आम्हाला पाहिजेच. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे, असे पर्यावरणप्रेमी मधु गावकर यांनी म्हटले.

  डिचोली मगो पक्षातर्फे डिचोलीत आयोजित करण्यात आलेल्या म्हादई बचाव जागृती पदयात्रेला मोठा प्रतिसाद लाभला. खांडेपार येथील रोमटामेळ पथकाने सादर केलेल्या मेळाने डिचोली दणाणून सोडली. डिचोली जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाजवळ कलश पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर या पदयात्रेला प्रारंभ झाला. “आमची म्हादय आमका जाय” “मगोचा निर्धार म्हादईचा उध्दार” अशी घोषणा देत हि पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज मैदानजवळून नगरपालिका रस्ता, आतीलपेठ, गावकरवाडा मार्गे शांतादुर्गा मंदिरसमोरील नदीवर कलशातील पाणी विसर्जित करण्यात आले. नंतर पदयात्रा वॉकींग टेकवरून डिचोली पुलाजवळील सेतूसंगमवर दाखल झाली व तेथे जाहिर सभा झाली. सभेचे सूत्रसंचालन नरेश कडकडे यांनी केले.

Related Stories

नवे शैक्षणिक धोरण पुढील वर्षापासून

Patil_p

देवभूमी अंत्रुज नगरीत आजपासून देवीचा जागर

Amit Kulkarni

गोव्यात अडकलेली गरोदर महिला सुखरूप खानापूरला

Patil_p

करमल घाटात अपघातः वाहतूक खोळंबली

Amit Kulkarni

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचे श्री मंगेश दर्शन

Amit Kulkarni

चंद्रकांत बांदेकर खून प्रकरणातील संशयिताच्या मुसक्या आवळल्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!