तरुण भारत

सांगली मनपा शाळेतील चिमुकले रमले आठवडी बाजारात; ग्राहकांची अलोट गर्दी

सांगली/प्रतिनिधी

सांगली शहरांमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय महानगरपालिका शाळा क्रमांक 42 संजयनगर, सांगली. शाळेने विविध उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. आज शनिवारी (दि1) या चिमुकल्यांनी शाळेच्या आवाराजवळ 100 फुटी रोड संजयनगर सांगली येथे रस्त्यावर भाजी मंडईची लगबग, भाजी घ्या…. भाजीचा आवाज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या, विविध प्रकारच्या सेंद्रिय भाज्या, खाण्याचे स्टॉल, फनी गेम्स असे सगळे दृश्य महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्याकडून पाहायला मिळाले. शाळेच्या आवाराजवळ रोडवर आठवडा बाजार भरवला होता.

Advertisements

यामध्ये शालेय परसबागेत उत्पादित केलेला सेंद्रिय भाजीपाला, विविध प्रकारच्या फळभाज्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल, गेम्स, आदी पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. चिमुकल्यांनी भरवलेल्या बाजारातील पालेभाज्या, खरेदी करण्यासाठी तसेच चहा,सामोसा, वडापाव, भडंग, भेळ, पाणीपुरी, कुर्मापुरी, मसालेदार दूध, पदार्थ चाखण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. खरेदीसाठी आलेल्या पालकांना पाहून या छोट्या बाल विक्रेत्यांनाही चांगलाच हुरुप चढला होता.

व्यावहारीक ज्ञानाची माहिती प्रत्यक्ष अनुभवाने घेत विद्यार्थ्यांना नफातोटा, वजनमापे, पैसे रुपये, बेरीज, वजाबाकी ,गुणाकार, भागाकार या क्रिया झटपट करता याव्यात तसेच नाणी व नोटा पैशांची आकडेमोड अगदी जलद गतीने अचूक करता यावी या हेतूने प्रेरित होऊन आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजारामध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह परिसरातील पालक , नगरसेवक व इतर नागरिकांनी खरेदीचा मनसोक्त आनंद घेतला. सदर चिमुकल्यांच्या बाल बाजारामध्ये विविध प्रकारचे 50 स्टॉल लावले होते. या बाजारात शालेय परसबागेतील भाजीपाला विक्रीचे 590 रुपये सह एकूण 5400रूपये रकमेची उलाढाल झाली. स्वनिर्मितीचा व पहिल्या स्वकमाईचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

बाजार संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी तेथील जागेची व विक्रीसाठी बसलेल्या ठिकाणाची स्वच्छता करून ओला व सुका कचरा वेगवेगळा करून समाजापुढे एक आदर्श ठेवला. जणू काही स्वच्छ सांगली करण्यासाठी चुणूकच दाखवली. आणि ही गोष्ट नागरिकांच्या मनात घर करून गेली.

यानिमित्ताने सदर भाजी बाजाराला भेट देण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे ,युवराज हलवान, विक्रम ठाकरे आदी शिक्षक उपस्थित होते. सदर उपक्रमाचे परिसरातील नागरिक तोंडभरून कौतुक होत होते व खरेदीचा आनंद घेत होते. सदर भाजीबाजाराचे आयोजन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रेरणेतुन प्रशासन अधिकारी हणमंत बिरजदार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सुमन टोणपे, शशिकला गौंडाजे, विजय गरंडे, शंकर ढेरे, श्वेता कबाडे, पूजा पत्की, वैशाली जाधव, सुरेखा जाधव यांनी केले .

Related Stories

आटपाडीत आला दीड कोटींचा बकरा : कार्तिक पौर्णिमा जनावरांच्या बाजाराला प्रतिसाद

Abhijeet Shinde

मिरज तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का, बड्या नेत्यांच्या गावातून सत्ता निसटली

Abhijeet Shinde

पारध्यांनी केला पोलीसांचा सत्कार

Abhijeet Shinde

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी राज्यासह केंद्रानेही मदत करावी

Abhijeet Shinde

जिल्हा परिषद सांगलीची सर्वसाधारण सभा खुली घेणेसाठी परवानगी द्या

Abhijeet Shinde

महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर्स फेडरेशन लि. मुंबई शाखा कोल्हापूरच्या अध्यक्षपदी पद्मिनीदेवी शिंदे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!