तरुण भारत

सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कामगिरी : तब्बल 159 मिनिटे भाष्य

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर करताना नवा विक्रम रचला आहे. तब्बल 2 तास 39 मिनिटे (159 मिनिटे) अविश्रांत भाषण केले. देशाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण ठरले आहे. सीतारामन यांनी गतवर्षीच्या आपल्याच अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम यावेळी मोडीत काढला. सुमारे पावणे तीन तास भाषण करणाऱया सीतारामन यांचे भाषण आणखाही काही काळ चालणार होते. मात्र बोलताना त्यांना त्रास जाणवू लागल्याने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सुचनेनुसार त्यांनी आपले भाषण थांबवले.

Advertisements

पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री असलेल्या सीतारामन यांनी गतवर्षीही विक्रमी अर्थसंकल्पीय भाषण केले होते. मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतर जुलै महिन्यात सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना 2 तास 15 मिनिटे भाषण केले होते. यापुर्वी रालोआ सरकारच्याच काळात जसवंत सिंग यांनी 2 तास 13 मिनिटांचे प्रदीर्घ भाषण केले होते. त्यांचा विक्रम गतवेळीच मोडणाऱया सीतारामन यांनी यंदा आपलाच विक्रम मोडीत काढला.

Related Stories

1 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण

Patil_p

भारत-चीन यांच्यात तणावशिथिलतेवर एकमत

Patil_p

भाजप अधिक बळकट होण्यास काँग्रेस जबाबदार – ममता बॅनर्जी

Abhijeet Shinde

संसदेत या, 1962 पासूनची चर्चा करुया!

Patil_p

काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान

Patil_p

विविध शहरांमध्ये मेट्रो लाईनचा विस्तार

Patil_p
error: Content is protected !!