तरुण भारत

क्वांटम तंत्रज्ञानासाठी 8 हजार कोटी

मोदी सरकारने नव्या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनवर भर दिला आहे. केंद्र सरकार पुढील 5 वर्षांमध्ये क्वांटम ऍप्लिकेशनवर 8 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

क्वांटम तंत्रज्ञान हे कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षाही प्रगत मानले जाते. तंत्रज्ञानाच्या जगात दीर्घकाळापासून क्वांटम कॉम्प्युटिंगवर काम सुरू आहे. भौतिकशास्त्राच्या क्वांटम तत्वावर काम करणाऱया या कॉम्प्युटिंगच्या अमाप संधी आहेत. संशोधनासाठी देखील हा एक उत्तम उपाय आहे. पूर्णपणे विकसित झालेला क्वांटम संगणक सद्यकाळातील सर्वात सामर्थ्यशाली महासंगणकापेक्षा कित्येक पटीने कार्यक्षम आहे.

Advertisements

क्वांटम कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठा डाटा तसेच माहिती अत्यंत कमी वेळेत प्रक्रियाकृत केली जाणार आहे. क्वांटम संगणकाच्या मदतीने कॉम्प्युटिंगशी संबंधित कामे अत्यंत कमी वेळेत पूर्ण होतील. हेच काम करण्यासाठी सद्यकालीन उपकरणे आणि तंत्रज्ञानाला अनेक वर्षे लागत आहेत. या नव्या प्रोसेसरच्या मदतीने नव्या औषधांच्या संशोधनापासून शहरांचे व्यवस्थापन अणि वाहतुकीसारखी कामे सुलभ होणार आहेत.

 

गुगलला मिळाले यश

दिग्गज तंत्रज्ञान कंपनी गुगलने मागील वर्षी क्वांटम कॉम्प्युटिंग संशोधनाशी संबंधित एक प्रयोगात्मक क्वांटम प्रोसेसर विकसित करण्यास यश मिळाल्याची घोषणा केली होती. महासंगणकाच्या मदतीने काही कॅलक्युलेशन्स करण्यासाठी सद्यकाळात हजारो वर्षांचा कालावधी लागणार होता. पण अशी कॅलक्युलेशन्स या प्रोसेसरच्या मदतीने काही मिनिटांत करणे शक्य झाले आहे. क्वांटम तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉम्प्युटिंग पूर्णपणे बदलणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. गुगलचे संशोधन सायंटिफिक जर्नल नेचरमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. क्वांटम स्पीडअपला प्राप्त करता येऊ शकते आणि याकरता भौतिकशास्त्राचे कुठलेच छुपे तत्व लागू होत नसल्याचे संशोधकाने नमूद केले आहे. जगातील सर्वात वेगवान महासंगणकाला किमान 10 हजार वर्षांचा कालावधी लागणारे कॅलक्युलेशन गुगलचा प्रोसेसर केवळ 30 मिनिटे आणि 20 सेकंदात करू शकतो.

नव्या प्रोसेसरचे तंत्रज्ञान क्वांटम बीट्स किंवा क्यूबिट्सच्या मदतीने काम करते, या तंत्रज्ञानात डाटा व्हॅल्यूला मॉडर्न कॉम्प्युटिंग लँग्वेज प्रमाणे झिरो आणि वनच्या व्हॅल्यूमध्ये नोंद होतो गुगल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम आणि इंटेलसारख्या कंपन्या या तंत्रज्ञानावर काम करत आहेत.

Related Stories

राजस्थानात 15 मंत्री शपथबद्ध

Patil_p

दिल्ली : मागील 24 तासात 7 मृत्यू; 135 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

उत्तराखंडात 112 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

ट्रम्प अहमदाबादमध्ये दाखल, मोदींकडून गळाभेट

tarunbharat

शेतकरी आंदोलन : हरियाणा सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

डिसेंबरमध्ये विक्रमी करसंकलन

Patil_p
error: Content is protected !!