तरुण भारत

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा घोळाबाबत पालकांनी मांडल्या व्यथा

प्रतिनिधी/ सातारा

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा ही दि. 5 जानेवारीला झाली तर दि. 12 जानेवारीला वर्तमानपत्रात फेक कॉल येतील त्यावर पालकांनी विश्वास ठेंवू नये असे शाळा प्रशासनाकडून आवाहन केले होते. त्यानुसार पालकांना फोन आले. फोननुसारच पाल्यांना गुण मिळाल्याने अचंबित झाले. पालकांनी याचा जाब विचारण्याकरता सैनिक स्कूल प्रशासनाकडे गेले परंतु प्रशासनाने त्यांना जवळ केले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारीही सकाळी पालक सैनिक स्कुलच्या गेटवर जमले. अगोदर पत्रकारांशी अनऑफिशली प्राचार्या मनिषा मिश्रा यांनी सैनिक स्कूलच्या बाबत केलेले आरोप निराधार आहे असे सांगितले. तर पालकांनी आपल्या व्यथा त्यांच्याकडे कथन केल्यानंतर त्यांनी तुम्ही सायबर सेलकडे तक्रार करा असा सल्लाही दिला. 

सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेत घनशाघोळ झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. दरम्यान, पालकांना फोन करुन तुमचा विद्यार्थी बसवायचा असल्यास दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे भरा नाही तर आहे तेवढेच मार्क राहतील अशी विनंती केली होती. त्यानुसार तेवढेच मार्क मिळाल्याचे निकालादिवशी पाहयला मिळाले. त्यामुळे पालकांनी नेमके त्यांना आमचे मोबाईल नंबर, आधार नंबर, पाल्याचे मार्क कसे काय माहिती याबाबत गुढ वाटले. त्यांनी नेमकेपणा काय हे जाणून घेण्याकरता पालकांनी शुक्रवारी सैनिक स्कूलच्या प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु सैनिक स्कूलच्या प्राचार्यांनी साधे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदन देवून नाराजी व्यक्त केली. तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शनिवारीही सकाळी पालक जमा झाले. तत्पूर्वी सैनिक स्कूलमधून माध्यमांच्या प्रतिनिधीना फोन गेले. प्राचार्या मनिषा मिश्रा यांनी पत्रकारांशी अनऑफिशल माहिती देत आहे असे सांगत त्या म्हणाल्या, देशाच्या संरक्षण मंत्रालयातंर्गत नियंत्रण असलेल्या सैनिक स्कूल सोसायटी दिल्ली यांच्यामार्फत देशभरातील सर्व सैनिक स्कूलमधील सहावी व नववी करता विद्यार्थी प्रवेश परीक्षा दि. 5 रोजी झाली. त्या संबंधाने सैनिक स्कूलशी संबंधित नसलेल्या त्रयस्थ व्यक्तीकडून इच्छुक पालकांची प्रवेशाबाबत दिशाभूल करुन फसवणूक करण्याचे प्रयत्न केले जात आहेत असे स्कूल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले. परीक्षेपूर्वी आम्ही निवेदन दिले होते. प्रवेश परीक्षेकरता ऑनलाईन अर्ज वेबसाईटवर भरावे लागतात. अर्जाची छाननी होवून पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेचे ऍडमिट कार्ढ पाठवले जाते. त्यानंतर प्रवेश परीक्षा नियुक्त केंद्रावर पार पाडल्या. निकाल गुणवत्तेनुसार दिल्ली कार्यालयाकडून तयार केला जातो. त्यानंतर सैनिक स्कूलकडून जाहीर करण्यात येतो. यामध्ये सैनिक स्कूलचा कोणताही हस्तक्षेप नसतो, असे सांगितले. दरम्यान, त्यांनी पुन्हा पालकांची बैठक घेवून पालकांचें गाऱहाणे ऐकून घेतले. पालकांनी त्यांना ऍन्सरशीट व मुलांची पेपरची कॉर्बन कॉपी मिळावी अशी मागणी केली. त्यावर आलेल्या फोनची विचारणा केली. प्राचार्यानी त्यांना तुम्ही सायबर सेलकडे तक्रार करा, असा सल्ला दिला. तेथून पालकांनी सातारा शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांकडे तक्रारीबाबत व घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनीही तुम्ही अजून दोन दिवस प्रतिक्षा करा, नंतर तक्रार दाखल करा, असा सल्ला दिला. रात्रीही पालकांची बैठक झाल्याचे समजते. दरम्यान, पालकांनी जिल्हाधिकाऱयांकडे दिलेला तक्रार अर्ज हा पोलीस प्रशासनाकडे वर्ग करण्यात आल्याचे समजते.

मुळापर्यंत शोध लागला पाहिजे

विद्यार्थ्यांचे गुण एवढेच आहेत हे कसे माहिती पडले. फोन नंबर कसे माहिती पडले हे एक कोडे आहे. त्यामागे रॅकेट असण्याची शक्यता असून मुळापर्यंत जावून याचा छडा लागला गेला पाहिजे. भ्रष्टाचाराची किड नेमकी कुठे लागली आहे. त्यावर औषधाची मात्रा दिली गेली पाहिजे अशी पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Related Stories

सातारा जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन सुरू

Patil_p

ग्रेडसेपरेटरच्या उद्घाटनाच्या दुसऱयाच दिवशी अजितदादा साताऱयात

Patil_p

अतिक्रमण हटावची पुन्हा पोकळ कारवाई

Patil_p

सातारा : पालिका पदाधिकाऱ्यांनी केली विसर्जन तळ्याची पाहणी

triratna

पालिकेच्या लेट लतिफांची धरपकड

Patil_p

साताऱ्यात महिलेचे मंगळसूत्र लांबवले

datta jadhav
error: Content is protected !!