तरुण भारत

सोलापूर : पिकअप-दुचाकीची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार

तरुण भारत संवाद

प्रतिनिधी/ कुर्डुवाडी

Advertisements

पिक अप आणि मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोटारसायकलवरील आजोबा व नातू जागीच ठार झाल्याची घटना घडली. अभिजित रमेश मोरे (वय२२, रा. कन्हेरगाव), महादेव नामदेव डांगे (६५, रा. पिंपळनेर (डोणवाडी) ता. माढा) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. कुर्डू, ता. माढा येथे आज, रविवारी (दि.) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत माहिती अशी की, टेंभुर्णीकडून कुर्डुवाडीच्या दिशेने बोलेरो पिकअप क्रमांक (एम२४.बी६३२५) भरधाव वेगात निघाली होती. ही पिकअप कुर्डू हद्दीत झुंडरे वस्ती नजीक आली असतात ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणाऱ्या मोटारसायकल क्र. (एमएच४५डब्ल्यू९९४३) ला जोराची धडक झाली. या धडकेत मोटारसायकलवरील आजोबा व नातू जागीच ठार झाले.

Related Stories

हॅलो, पंकजाताई… राज्यभरातून फोन संतोषभाऊंना

Abhijeet Shinde

वैराग नगरपंचायतीचा प्रश्न आता अंतिम टप्यात

Abhijeet Shinde

सोलापूर : लवकरात लवकर नुकसानीचे पॅकेज जाहीर करा

Abhijeet Shinde

साई जन्मभूमी वाद चिघळणार

prashant_c

बार्शी तालुक्यातून दोन जण हद्दपार

Abhijeet Shinde

भारत बंदला अल्प प्रतिसाद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!