तरुण भारत

‘उत्पादन’च्या ‘शुल्क’परवान्यात वाढ

विद्याधर पिंपळे / कोल्हापूर

राज्यातील दारू उत्पादक,होलसेल विक्रेते,परमिटरूम,वाईन शॉप यांच्या परवाना नुतणीकरण  फी मध्ये यावर्षी 10 वरून 15 टक्के करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. या नुतणीकरण परवाना फी वाढीमुळे तळीरामांना मोठा फटका बसणार आहे. परवाना नुतणीकरण फी वाढीमुळे कोल्हापूर शहरामधील परमिट रूमच्या फीमध्ये 69 हजार रूपयाची वाढ होणार आहे.

Advertisements

ब्रिटीश कालापासून राज्य उत्पादन शुल्क हा विभाग ओळखला जात आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी 1790 पासून उत्पादन शुल्क पध्दत सुरू करण्यात आली आहे.  यानंतर 1878 मध्ये दारू व गुंगी असणाऱया पदार्थाच्या व्यापारामधून जादा महसूल मिळवण्यासाठी, मुंबई उत्पादन शुल्क कायदा अंमलात आणला. तर 1949 मध्ये दारूबंदी कायदा अंमलात आणला. पण महसुल वाढवण्यासाठी 1968 मध्ये ताडी व बिअरचा समावेश करण्यात आला.. तर 1973 ला देशी व विदेशी दारूच्या किरकोळ विक्रीसाठी मोठया प्रमाणावर परवाने देण्यात आले. यावेळी यातून 1..64 कोटीचा महसूल मिळाला होता.  तर हाच महसूल वाढत गेल्याने, 2016-17 मध्ये राज्य शासनाला 12287.90 कोटी इतका महसूला मिळाला. असल्याचे सांगण्यात आले. यावरून राज्य उत्पादन शुल्क विभाग हा महसूल मिळवणारा टॉप टेन विभाग ठरला आहे.

राज्यातील परवाना फी ही लोकसंख्येवरून आकारली जात आहे. ग्रामीणपासून मेट्रो शहरापर्यंत दारू विक्री परवान्याच्या फी ची आकारणी होऊ लागली आहे. यामध्ये दारू निर्माते,होलसेल विक्रेते,लिकर शॉप,परमिट रूम, वाइं&न शॉप यांचा समावेश आहे.. शासनाला जादा महसुल मिळावा म्हणून, दरवर्षी परवाना नुतणीकरणामध्ये मनमानी वाढ होत होती.यासाठी दारू संघटना,परमिट रूम संघटना यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने दरवर्षी या परवाना फी मध्ये 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय दिला होता. त्याप्रमाणे दारू विक्रेते आपली नुतणीनरण फी भरत होते. नुकत्याच झालेल्या निवडाणूकीच्या पार्श्वभूमीवर  गेल्यादोन वर्षात परवाना फीमध्ये वाढ केलेली नाही. मात्र 2020-21 साठी ही फी 10 वरून 15 टक्के करण्याचे परिपत्रक गृह विभागाने काढले असून,हे परिपत्रक राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्तांकडे पाठवण्यात आले आहे. वाढीव परवाना फीमुळे दारूच्या दरात वाढ होणार हे निश्चित आहे. 31 मार्च अखेर ही फी भरावयाची आहे. ही  फी कमी व्हावी यासाठी दारू व्यावसायिकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकसंख्या व परवाना फी हे धारेण बदलावे-बाबा निंबाळकर,अध्यक्ष, कोल्हापूर परमिट रूम व बिअर बार असोसिएशन

लोकसंख्या व परवाना फी यामुळे कोल्हापूरच्या  दारू व्यावसायिकांना फटका बसत आहे.एक व्यक्ती वाढली तरी फी वाढत असते.5,00,001 ते 10 लाख लोकसंख्या असणाऱया, परमिट रूमच्या परवान्यासाठी फी 4,लाख 62 रूपये इतकी आहे. कोल्हापूरची लोकसंख्या 5 लाखापेक्षा जास्त असल्याने शहरातील परमिट रूमधारकांनी नविन फी नुसार जादा 70 हजार रूपये भरावे लागणार आहेत. यामुळे या व्यावसायावर मोठा परिणाम होणार आहे यासाठी कोल्हापूर शहरची फी आकारणीसाठी 5 ऐवजी 8 लाख करावी अशी मागणी करणार आहे.

Related Stories

‘किसान सन्मान’ मधिल ५० हजार शेतकरी वंचित

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांना मिळणार एक रकमी एफआरपी

Abhijeet Shinde

राधानगरी धरण 75 टक्के भरले, 1425 क्युसेकने विसर्ग सुरु

Abhijeet Shinde

कोल्हापूर : स्त्री भ्रुणहत्येतील दोषींवर कठोर कारवाई करा

Abhijeet Shinde

कुर्बानीचा बकरा @ 1 लाख 10 हजार

Abhijeet Shinde

‘या’ गोष्टींमुळे कासारपुतळेने केली कोरोनामुक्त गावाकडे वाटचाल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!