तरुण भारत

केवळ 12 दिवसातच पामेलाचा विवाह संपुष्टात

हॉलिवूड अभिनेत्रीचे झाले आहेत 5 विवाह

वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को

Advertisements

हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री पामेला अँडरसनने 20 जानेवारी रोजी चित्रपट निर्माते जॉन पीटर्स यांच्याशी विवाह करून सर्वांना चकीत केले होते. एकेकाळी हेअरड्रेसर राहिलेल्या जॉन यांच्याशी पामेलाचा विवाह अत्यंत खासगी सोहळय़ात पार पडला होता. विशेष बाब म्हणजे पामेलाचा हा 5 वा विवाह होता. पण विवाहाच्या 12 दिवसताच पामेला आणि जॉन हे विभक्त झाले आहेत.

माजी ‘बेवॉच’ स्टार म्हणजेच पामेलाला बेक हवा असल्याने तिने जॉन पीटर्स सोबतचा 12 दिवसांचा विवाह संपुष्टात आणला आहे. जॉन आणि माझ्या जोडीला मिळालेले प्रेम पाहून अत्यंत आनंदी आहे. पण परस्परांपासून आणि या जीवनापासून काय हवे हे जाणून घेण्यासाठी काही काळाचा बेक घेतला आहे. याकरता चाहत्यांचे पूर्ण समर्थन आवश्यक असल्याचे पामेलाने म्हटले आहे.

जॉन पीटर्सपूर्वी पामेला अँडरसनचे 4 विवाह झाले आहेत. 52 वर्षीय पामेलाने पहिला विवाह अमेरिकन संगीतकार टॉमी ली याच्याशी केला होता. विवाहाच्या तीन वर्षांनी ते विभक्त झाले हेते. पुढील काळात पामेलाने किड रॉकशी विवाह केला होता.

रॉकसोबतचा संसार संपुष्टात आल्यावर पामेलाने चित्रपट निर्माते रिक सोलोमान यांच्याशी विवाह केला होता. सोलोमान यांच्याकडून घटस्फोट घेतल्यावर पामेलाने पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेतले होते. पण हे सामंजस्य फार काळ टिकले नव्हते.

पामेला भारतीय बिग बॉसमध्यं सामील झाली होती. या कार्यक्रमातील सर्वात महागडय़ा भागीदारांपैकी ती एक ठरली होती. पामेलाचे भारतात असंख्य चाहते आहेत. 

Related Stories

भारताचा खलिस्तानी नकाशा जारी

datta jadhav

पाकिस्तानात 60 हिंदूंचे धर्मांतर

Patil_p

जग कोरोनामुक्त करणे आता अशक्य

datta jadhav

ब्राझीलमध्ये 8.5 लाखाहून अधिक कोरोनाबाधित

datta jadhav

जगातील सर्वात मोठा ट्रक

Patil_p

कोरोना संक्रमणाचा मेंदूवरही परिणाम

Patil_p
error: Content is protected !!