तरुण भारत

कसोटी मानांकनातील कोहलीचे अग्रस्थान कायम

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपले अग्रस्थान कायम राखले असून ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱया स्थानावर आहे.

Advertisements

कसोटी फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत कोहली 928 गुणांसह पहिल्या स्थानावर असून स्टीव्ह स्मिथ 911 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. मात्र भारतीय कसोटी संघाचा उपर्णधार अजिंक्य रहाणेचे स्थान घसरले असून तो आता 759 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. जेतेश्वर पुजारा 791 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या 10 फलंदाजांमध्ये भारताच्या चार फलंदाजाचा समावेश आहे.

कसोटी गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या बुमराहने 794 गुणांसह सहावे स्थान, रविचंद्रन अश्विनने आठवे तर मोहम्मद शमीने नववे स्थान मिळविले आहे. कसोटी अष्टपैलूंच्या मानांकन यादीत भारताचा रविंद्र जडेजा 406 गुणांसह तिसऱया स्थानावर असून अश्विन 308 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

Related Stories

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

Patil_p

कृणाल पंडय़ाची विमानतळावर चौकशी

Patil_p

काश्मीर ते कन्याकुमारी …नव्या विक्रमाची सायकलस्वारी

Patil_p

ख्रिस केर्न्स आयसीयूमध्ये

Amit Kulkarni

गुड न्यूज : अनुष्का-विराट आई-बाबा बनणार !

Rohan_P

डेव्हिस चषक -क्रोएशिया उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!