तरुण भारत

भाडे वसुलीकरिता मालमत्तेवर बोजा दाखल करण्याचा विचार

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी भाडे थकविल्याने टाळे ठोकण्याची कारवाई राबविण्यात येत आहे. तरीदेखील गाळेधारकांनी भाडे भरण्याची तयारी दर्शविली नाही. त्यामुळे गाळेधारकांच्या मालमत्तेवर बोजा दाखल करण्याचा विचार महसूल विभागाने चालविला असल्याची माहिती उपलब्ध झाले आहे.

Advertisements

महसूल विभागाने मटन मार्केट, महात्मा फुले भाजी मार्केट, मध्यवर्ती बस स्थानकासमोरील व्यापारी संकुल, गोवावेस, टिळकवाडी कलामंदिर शेजारी संकुलातील व्यापारी गळय़ांना टाळे ठोकून भाडे वसूल करण्याचा प्रयत्न केला. मटन मार्केट मधील चाळीस गाळेधारकांनी निम्मी रक्कम जमा करून उर्वरित रक्कम भरण्यासाठी मुदत घेतली आहे. मध्यवर्ती बस स्थानक आणि गोवा वेस व इतर ठिकाणाच्या गाळेधारकांनी भाडे भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. टाळे ठोकल्यानंतर भाडे भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तरीदेखील गाळेधारकांनी भाडे भरले नाही. त्यामुळे भाडे कसे वसूल करायचे? हा प्रश्न महापालिका प्रशासन समोर निर्माण झाला आहे. भाडे वसूल करण्यासाठी मालमत्तेवर बोजा दाखल करण्याचा विचार महसूल विभागाने चालविला आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत भाडे भरलेल्या गाळेधारकांना गाळे खुले करून देण्यात आले.. पण भाडे भरण्यास टाळाटाळ करणाऱया गाळेधारकांच्या गाळय़ांना टाळे आहेत. 

मोडका बाजार येथील भाडेकरूकडे मोठय़ा प्रमाणात भाडे थकले

जुना धारवाड रोड मोडका बाजार येथील भाडेकरूकडे मोठय़ा प्रमाणात भाडे थकले आहे. त्यामुळे सदर भाडे एकाच वेळी भरणे शक्मय नसल्याने हप्त्याने भरण्याची तयारी गाळेधारकांनी दर्शवली होती. त्यामुळे त्यांना चार हप्त्यांत भाडे भरण्याची मुभा प्रादेशिक आयुक्तानी दिली होती. मुदत देवून महिना उलटल्याने भाडे वसुलीबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश प्रादेशिक आयुक्तांनी मनपाला दिला आहे. पण गाळेधारकांनी अद्याप भाडे भरले नसल्याने तसा अहवाल प्रादेशिक आयुक्तांना देण्यात येणार असल्याची माहिती मनपा कार्यालयामधून उपलब्ध झाली आहे.

 

Related Stories

विकास केल्याचा मावळत्या बुडा अध्यक्षांचा दावा

Amit Kulkarni

नंदगड जेसीएस शाळेच्या विलीनीकरणाला विरोध

Patil_p

कुमारस्वामी लेआऊटमधील भूखंडांची होणार विक्री

Patil_p

बेळगुंदी भागातील बससेवा सुरळीत करा

Amit Kulkarni

नार्वेकर गल्लीत दूषित पाण्याचा पुरवठा

Amit Kulkarni

परराज्यातून येणाऱया चाकरमान्यांच्या संख्येत वाढ

Patil_p
error: Content is protected !!