तरुण भारत

केरळमध्ये आढळला कोरोना विषाणूचा तिसरा रुग्ण

ऑनलाईन टीम / तिरुवअनंतपुरम : 

कोरोनामुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. आता राज्य सरकारनं दिलेल्या नव्या माहितीनुसार केरळमध्ये कोरोनाचा आणखी एक म्हणजेच तिसरा रुग्ण आढळला आहे.  

Advertisements

या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. हा रुग्ण नुकताच वुहानमधून भारतात परतला होता.

यापूर्वी चीनमधून परतलेल्या एका विद्यार्थिनीला करोना विषाणूची लागण झाली होती. त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये या रुग्णाला दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 

Related Stories

केरळमध्ये आढळला ‘झिका’ विषाणूचा पहिला रुग्ण

Rohan_P

भारतात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

datta jadhav

पश्चिम बंगालमधील हिंसाचार निषेधार्ह

Patil_p

देशात कोरोनाचे नवे 3320 रूग्ण

Patil_p

8 मतदारसंघांच्या निवडणूक अधिकाऱयांना हटविले

Patil_p

मंगळवेढयात बंदला संमिश्र प्रतिसाद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!