तरुण भारत

मोकाट कुत्र्याने घेतला दोन मुलांचा चावा

प्रतिनिधी / शिरोळ

उदगाव ( ता. शिरोळ ) येथील रुद्र रमेश मगदूम ( वठारे )वय ४ वर्षे व दानलींग राजकुमार पाटील वय ८ वर्षे या दोन लहान मुलांना मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत जखमी केले. ही घटना सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली, त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Advertisements

उदगाव येथील कदम गल्ली जवळ राहणाऱ्या रुद्र मगदूम या मुलावर प्रथम मोकाट कुत्र्याने हल्ला चढवला. त्यानंतर जोगेश्वरी मंदिरानजीक राहणाऱ्या दानलिंग पाटील या मुलालाही या कुत्र्याने चावा घेत जखमी केले. गावात सतत वाढत जाणार्‍या या मोकाट कुत्र्यांमुळे ग्रामस्थांना मोठा त्रास होत आहे. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली असून दोन्ही मुलावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Stories

संचारबंदी दरम्यान पोलिसांच्या धडक कारवाईत सातशे वाहने जप्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर : अवचितवाडी – ठाणेवाडी दरड कोसळल्याने बोळावी रस्ता ठरला धोकादायक

Abhijeet Shinde

विज बिल माफीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने रास्ता रोको

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 17 रुग्ण, एकूण संख्या 278 वर

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठाचा ४१ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे उद्घाटन

Abhijeet Shinde

शिरोळ तालुक्यातील हरोलीत विजेचा धक्क्याने विजेच्या पोलवरतीच वायरमनचा मृत्यू 

Abhijeet Shinde
error: Content is protected !!