तरुण भारत

लोखंड चोरी प्रकरणी चौकडीला अटक

माळमारुती पोलिसांची कारवाई, एक टन लोखंड जप्त

बांधकामासाठी आणलेले लोखंड चोरी केल्याच्या आरोपावरुन माळमारुती पोलिसांनी के.के.कोप्प (ता. बेळगाव) येथील चौघा जणांना अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी कणबर्गी येथे लोखंडाची चोरी झाली होती. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर त्यांच्या सहकाऱयांनी या चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे.

Advertisements

संतोष प्रकाश मेदार (वय 27), राकेश सोमाप्पा शिंग्यानकोप्प (वय 20), संजीव चंद्रया गणाचारी (वय 20), प्रशांत सिध्दराम गाणगी (वय 20, सर्व रा. के. के. कोप्प, ता. बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. संतोष हा पेंडाल कंत्राटदार असून उर्वरित तिघे जण शेती करतात.

सोमवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन सर्व चौघा जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्दितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांच्यावर भा.दं.वि. 379 कलमान्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने आणखी कोठे चोरी केली आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कणबर्गी येथे नव्या घराच्या बांधकामासाठी आणलेले 2 टन लोखंडाची चोरी झाली होती. संतोष त्याचे साथीदार पेंडाल घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी बांधकामावर पडलेले लोखंड त्यांनी चोरले होते. सोमवारी 1 टन लोखंड जप्त करण्यात आले आहे.

Related Stories

रस्त्यावर चलनी नोटा टाकण्याचे प्रकार सुरूच

Patil_p

रस्ते अडवणुकीबरोबर लढून नागरिकांची सहनशीलता आली संपुष्टात

Patil_p

कंग्राळी बुद्रुक येथील चव्हाट गल्लीला आले नदीचे स्वरुप

Amit Kulkarni

कर्ले-बेळवट्टीचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर

Omkar B

जिल्हा प्रशासनाविरोधात शेतकऱयांची पोलिसात फिर्याद

Patil_p

डॉ.आंबेडकरांनी संविधनाद्वारे देशाला दिली देण

Patil_p
error: Content is protected !!