तरुण भारत

‘युगानुयुगे तूच’मुळे जगण्याच्या दृष्टीत बदल

कणकवली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचेच अशीच प्रतिमा आजवर निर्माण केली गेली. पणयुगानुयुगे तूचहा दीर्घ कवितासंग्रह वाचल्यावर लक्षात आले, बाबासाहेब हे साऱयाच समाजाचे आहेत. शोषितांसाठी लढा उभारताना त्यांनी स्त्राr हक्क मिळवून दिला. त्यांनी शेतीचे प्रश्न मांडतानाच कामगारांना न्याय मिळवून दिला. या साऱयाची मांडणीयुगानुयुगे तूचमध्ये असून हा संग्रह वाचल्यावर जगण्याकडे बघण्याची दृष्टीच बदलली, असे मत येथे तरुणाईने व्यक्त केले.

Advertisements

वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या वाचन संस्कृती विकास उपक्रमातर्फे तरुणाईच्या सहभागाने कवी अजय कांडर लिखित आणि लोकवाङ्मयगृह प्रकाशितयुगानुयुगे तूचया आंबेडकरांवरील दीर्घ कविता संग्रहावर चर्चासत्र झाले. गोपुरी आश्रमच्या गणपत सावंत सभागृहात आयोजित कार्यक्रमात सीमरन हरमलकर या युवतीनेतू नव्हतास कोणाच्या विरोधात, तू होतास माणसांच्याच बाजूनेयायुगानुयुगे तूचमधील काव्यपंक्ती म्हणजे बाबासाहेबांना एका विशिष्ठ समाजात बांधता येत नसल्याचे सूचक आहे. बाबासाहेब सर्व भारतीयांचे आहेत, हाच विचार आपल्याला हा संग्रह देत असल्याचे आग्रहाने सांगितले. तिला उत्कृष्ट वाचक म्हणूनही अजय कांडर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष तथा वाचन संस्कृती विकास कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, संचालक अमोल भोगले, प्रा. डॉ. अनिल फराकटे, प्रा. डॉ. लालासाहेब घोरपडे, प्रा. मनीषा पाटील, श्री. सौ साळगावकर, सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा दळवी, अभिनेता नीलेश पवार, कवी श्रेयस शिंदे, रोहित जाधव, व्यंकटेश साळे, दिव्यांग कवयित्री अनिता साळगावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात 65 युवकयुवतींनी सहभाग घेतला.

सिद्धी वरवडेकर म्हणाली, आजवर आपण वाचलेले बाबासाहेबांचे विचार सहज समजून देणारा हा कवितासंग्रह आहे. माणसाने प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने बघायला पाहिजे, अशी आपली विकसित दृष्टी या संग्रहातील कविता करते. अंकिता सावंतने या कविता संग्रहाच्या वाचनामुळे आपल्या विचारात झालेल्या बदलांची माहिती दिली. पल्लवी कोकणीने यातील राजकीय भाष्यावर प्रकाश टाकत आजच्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला. शैलेश कदम याने कवितेतील विचार आणि वास्तव परिस्थिती विवेचन केले. सोनल भिसेने या कवितेतील चवदार तळय़ाच्या सत्याग्र्रहावर प्र्रकाश टाकला. अंकिता सामंतने माणूस जोपर्यंत विचाराने स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा काहीच उपयोग नाही. हा या कवितेतील बाबासाहेबांचा विचार महत्वाचा असल्याचे स्पष्ट केले. अमित राऊळने बाबासाहेबांच्या फक्त प्रतिमेत, जयंतीत अडकता त्यांच्या विचारांचे अनुकरण कधी करणार? हा कवितेतील प्रश्न उपस्थित केला. चिंतामणी सामंतने ही कविता म्हणजे महामानवाच्या विचारांचे अप्रतिम प्रकटीकरण असल्याचे सांगितले.

कांडर म्हणाले, बदलत्या व्यवस्थेवर युवकांनी परखड भाष्य करायला हवे. माणूस मोठा होण्यासाठी माणसाला प्रश्न पडण्याची गरज आहे. विषमतेचे विचार माणूस मनातून काढून टाकत नाही, तोपर्यंत अशा कविता लिहाव्याच लागतील. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे आणि एकमेकांशी संवाद साधत राहणे यातूनच बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे शक्मय आहे. डॉ. फराकटे यांनी युवाईने केलेल्या विवेचनाबद्ल गौरवोद्गार काढले. डॉ. घोरपडे यांनी आजचा युवक वाचनाची आवड जोपासत असल्याचे यातून दिसून येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रा. मनीषा पाटील यांनीही विचार व्यक्त केले. दिव्यांग भगिनी अनिता साळगावकरने लिहिलेली कविता अमित राऊळने सादर करून कार्यक्रमाचा समारोप केला.

Related Stories

पालिकेच्या कोरोना रॅपिड टेस्टिंगला नागरिकांचा प्रतिसाद

Ganeshprasad Gogate

अत्यावश्यक सेवेतील 45 वर्षाखालील कामगारांनाही लस देणे आवश्यक!

NIKHIL_N

बांदा मासळी मार्केट परिसरातील नाल्याच्या स्वच्छतेची मागणी

Rohan_P

सिंधुदुर्गचा ‘जीडीपी’ वाढण्यात जिल्हा बँकेचा मोठा वाटा

NIKHIL_N

दोडामार्गात शीत-शवपेटी लोकार्पण कार्यक्रम संपन्न

Ganeshprasad Gogate

परप्रांतियांना कोकण किनारपट्टी आंदण देण्याचा घाट!

NIKHIL_N
error: Content is protected !!