तरुण भारत

जुगारी अड्डय़ावरील कारवाई संशयाच्या भोवऱयात

पाच जुगाऱयांना का सोडून दिले? 9 जणांना अटक

प्रतिनिधी \ बेळगाव

Advertisements

हिरेबागेवाडी पोलिसांनी रविवारी रात्री बस्तवाड (ता. बेळगाव) जवळ एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकून 9 जुगाऱयांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून 19 हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र ही कारवाई सध्या संशयाच्या भोवऱयात अडकली आहे.

उपलब्ध माहितीनुसार रविवारी रात्री पोलीस निरीक्षक नागराज अंबीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी जुगारी अड्डय़ावर छापा टाकून 9 जुगाऱयांना अटक केली आहे. त्यांच्यावर हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी रात्री 5 जुगाऱयांची सुटका केल्याची माहिती मिळाली आहे. आर्थिक व्यवहार व राजकीय दबावामुळे बस्तवाड परिसरातील पाच जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता पोलिसांनी जुगाऱयांची नावे व माहिती देण्यास टाळाटाळ केली.

हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक नागराज अंबीगेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तर फोन उचलणेच टाळले. त्यामुळे जुगारी अड्डय़ावरील कारवाईत मोठा व्यवहार झाल्याचा संशय बळावला असून बेळगाव परिसरात असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. एखाद्या कारवाईनंतर अधिकाऱयांचा खिसा गरम केला तर त्यांची सन्मानाने सुटका करण्याचा सपाटा पोलीस अधिकाऱयांनी सुरु केला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

Related Stories

तानाजी गल्ली रेल्वेगेटजवळ सांडपाणी रस्त्यावर

Amit Kulkarni

स्मार्टसिटी कामाचा खर्च गेला पाण्यात

Amit Kulkarni

वारकऱयांवर गाणे तयार

Omkar B

बेकायदा दारुवाहतुक करणाऱया आलिशान कारवर कारवाई

Rohan_P

फ्लाईंग टेनिंग सेंटर एप्रिलपर्यंत सुरू होणार

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील एक इंचही सरकारी पड जमीन वनखात्याला देऊ नका

Amit Kulkarni
error: Content is protected !!