तरुण भारत

चिनी शेअरबाजाराचा 13 वर्षांमधील नीचांक

32 लाख कोटी गमावले, कोरोना विषाणूचा परिणाम

बीजिंग / वृत्तसंस्था

Advertisements

कोरोना विषाणू उद्रेकाचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेलाही बसणार हे हळूहळू स्पष्ट होत आहे. सोमवारी चीनमधील शेअरबाजाराने गेल्या 13 वर्षांमधील नीचांकी पातळी गाठली. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणावर समभागांची विक्री केल्याने निर्देशी सूचकांकाची 7.7 टक्के इतकी मोठी घसरण एका दिवसात झाली. कोरोनाचे संकट लवकर दूर झाले नाही तर येत्या तीन महिन्यात चीनी शेअरबाजारांचे अडीच लाख कोटी रूपयांचे नुकसान होऊ शकते.

यामुळे गुंतवणूकदारांना 32 लाख कोटी रुपयांचा मार बसला आहे. शेअरबाजाराप्रमाणेच चीनचे चलन असणारा युवानही मोठय़ा प्रमाणात घसरला आहे. सोमवारी एका दिवसात चीनच्या चलनाची किंमत अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत 1.5 टक्क्यांनी कमी झाली. चीनने आपल्या केंद्रीय बँकेतून शेअरबाजारात पैसा ओतून तो सावरण्याचा प्रयत्न केला. तसेच रूपयालाही बळकटी देण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याचा उपयोग न होता, घसरण सुरूच राहिली.

व्याजदरात सूट देणार

शेअरबाजाराच्या घसरणीने ज्या कंपन्यांना फटका बसला आहे, त्यांना यावर्षी कर्जांवरील व्याजदरात काही प्रमाणात सूट देण्याची घोषणा चीनने केली. असेच आर्थिक साहाय्य कोरोना पिडीत लोकांनाही दिले जाणार आहे. चीनच्या केंद्रीय बँकेने त्यादृष्टीने आपत्कालीन योजना सज्ज केली आहे.

Related Stories

चीनमधून भारतात जाणाऱया कंपन्यांना जपानचे अनुदान

Patil_p

चीनविरोधात बायडेन यांचे पहिले पाऊल

Amit Kulkarni

चिनी सैनिकांकडून 5 नागरिकांचे अपहरण

Patil_p

पाकिस्तानच्या राजकारणात नव्या ‘भुट्टो’चा उदय

Patil_p

बायडेनचा पहिला वार सौदी अरेबियावर

Amit Kulkarni

अमेरिकेत विमानाने लसीची वाहतूक सुरू

Patil_p
error: Content is protected !!