तरुण भारत

केरळमध्ये कोरोनाचा फैलाव

तिसरा रुग्णही केरळमध्येच :  विषाणूचा धोका वाढला

तिरुअनंतपुरम / वृत्तसंस्था

Advertisements

केरळमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला तिसरा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. केरळच्या कासारगोडमध्ये हा रुग्ण सापडला असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी दिली. भारतातील आणि देशातील कोरोना विषाणूचा हा तिसरा रुग्ण आहे. याआधी कोरोनाची लागण झालेले दोन्ही रुग्ण केरळमधीलच आहेत. दरम्यान, आतापर्यंत भारत, अमेरिकेसह जगातील 25 देशांमध्ये या आजाराचा फैलाव झाला आहे.

केरळमधील थ्रिसूरमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण गुरुवारी आढळला होता. तिसऱया रुग्णावर कासारगोडमधील कांजनगड जिल्हय़ातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. अलीकडेच हा रुग्ण चीनच्या वुहान शहरातून परतला होता. सध्या केरळच्या वेगवेगळय़ा रुग्णालयात दोन हजार संशयितांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार सुरू असल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आतापर्यंत 361 बळी

कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 361 जणांचा मृत्यू झाला असून, 14 हजारपेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. फिलिपाईन्समध्ये चीन व्यतिरिक्त एकाचा मृत्यू झाला आहे. विविध देशांनी चीनहून येणाऱया लोकांवर प्रवासी निर्बंध लादलेले असूनही, संसर्ग 24 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच ही जागतिक आरोग्य आपत्ती जाहीर केली आहे.

अमेरिका जगभर भीती पसरवतेय : चीनचा आरोप

अमेरिकेने कोरोना विषाणूबद्दल भीती व दहशत निर्माण केल्याचा आरोप चीनने केला आहे. कोरोनाग्रस्त चीनला आतापर्यंत अमेरिकेने कोणतीही ठोस मदत पुरविलेली नाही. मात्र, जगात चीनच्या नावाने केवळ दहशत निर्माण केली जात असल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनईंग यांनी केला आहे. चिनी प्रवाशांवर निर्बंध लादणारा अमेरिका हाच पहिला देश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या या पवित्र्यामुळे अन्य देशांमध्येही चीनसंबंधी नकारात्मक भूमिका तयार होत आहे. मात्र, या रोगाबाबत विज्ञानाचा आधार घेत सर्व देश आपल्या धोरणात सुधारणा करतील, असेही चुनईंग यांनी म्हटले आहे.

Related Stories

केंद्र सरकार आणतेय ‘संस्कारी’ गेम्स

Patil_p

कॅप्टन अभिनंदन यांना वीरचक्र प्रदान

Patil_p

प्रीकॉशन डोससाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अनावश्यक

Patil_p

दहावी, बारावी परीक्षांसाठी नियम शिथिल

Patil_p

ऑक्सिजन दाते सुधांशू कपूर

Patil_p

सत्तेवर आल्यास 300 युनिट वीज मोफत

Patil_p
error: Content is protected !!