तरुण भारत

टी-20 क्रमवारीत केएल राहुलची दुसऱया स्थानी झेप

वृत्तसंस्था/ दुबई

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत दमदार प्रदर्शन करणाऱया भारताच्या केएल राहुलने आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी-20 मानांकनात दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. कारकिर्दीत त्याने मिळविलेले हे सर्वोच्च मानांकन आहे.

Advertisements

राहुलने या मालिकेत 224 धावा फटकावल्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश असून 40 हून अधिक धावा एकदा जमविल्या होत्या. पाकिस्तानच्या बाबर आझमने या क्रमवारीत अग्रस्थान कायम राखले आहे तर भारतीय उपकर्णधार रोहित शर्माने टॉप टेनमध्ये स्थान मिळविले आहे. कर्णधार कोहली नवव्या स्थानावर कायम असून श्रेयस अय्यरने 63 स्थानांची प्रगती करून 55 व्या तर मनीष पांडेने 12 स्थानांची प्रगती करीत 58 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

गोलंदाजांमध्येही भारतीय खेळाडूंनी बढती मिळविली आहे. जसप्रित बुमराहने 26 स्थानांची प्रगती करीत 11 वे स्थान पटकावले आहे तर यजुवेंद्र चहलने 10 स्थानांची प्रगती करीत 30 वे, शार्दुल ठाकुरने 34 स्थानांची झेप घेत 57 वे स्थान मिळविले आहे. याशिवाय नवदीप सैनीने 71 वे (25 स्थानांची बढती), रवींद जडेजाने 76 वे (34 स्थानांची बढती) स्थान मिळविले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने या मालिकेत 160 धावा जमविल्या असून त्याने 23 वरून 16 व्या स्थानावर झेप घेतली आहे. टिम सेफर्टने 73 वरून 34 व्या तर रॉस टेलरने 50 वरून 39 व्या स्थानावर मजल मारली आहे. गोलंदाजांत लेगस्पिनर ईश सोधीने सहा स्थानांची प्रगती करीत 13 वे स्थान मिळविले आहे.

 

Related Stories

अफगाण- पाक मालिकेच्या ठिकाणात बदल

Patil_p

पदार्पणवीर रॉबिन्सन अवघ्या 5 दिवसात निलंबित!

Patil_p

कझाकमधील टेटे स्पर्धेत सिद्धेश-मुदितला कांस्य

Patil_p

इराकच्या ऑलिंपिक समिती प्रमुखपदी अबदेल्ला

Patil_p

2023 विश्वचषकासाठी फिंचची तयारी सुरु

Patil_p

गुड न्यूज : अनुष्का-विराट आई-बाबा बनणार !

Rohan_P
error: Content is protected !!