तरुण भारत

वाळपईतील बेकायदेशीर मासेविक्री बंद न केल्यास पालिका इमारतीसमोर मासे विकू

वाळपई / प्रतिनिधी

 वाळपाई नगरपालिका क्षेत्रामध्ये बेकायदेशीर मासळी विक्री करणाऱया विपेत्यावर नगरपालिकेने त्वरित कारवाई करावी अन्यथा चार दिवसानंतर येथील मासळी विपेत्यांना नगरपालिकेच्या दरवाजावर मासळी विक्री करण्यास भाग पाडू अशाप्रकारचा इशारा काँग्रेस समितीने दिला आहे .

नगरपालिका मार्केट मधील मासे विपेते यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस गट समितीच्या कार्यकर्त्यांनी आज वाळपई नगरपालिका मुख्याधिकारी यांची भेट घेतली व त्यांनी यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे. यावेळी मार्केट परिसरामध्ये निर्माण होत असलेली दुर्गंधी व नागरिकांना यामुळे होणारा त्रास यासंदर्भात गट समितीने मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले आहे .

 

याबाबतची माहिती अशी की वाळपई नगरपालिका क्षेत्राच्या अनेक ठिकाणी बेकायदेशीर प्रमाणात मासळी विक्री करण्यात येत आहे .यामुळे नगरपालिकेच्या मार्केट मधील मासे विपेत्यांना त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मार्केटमधील मासे विपेत्यांचा धंदा होत नसल्यामुळे त्यांना नुकसानी सहन करावी लागत असून बेकायदेशीर प्रमाणात मासे विक्री करणाऱया विरोधात कारवाई करण्याची मागणी करूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस समितीचे अध्यक्ष दशरथ मादेकर यांनी केला आहे .यासंबंधी आज सकाळी गट समितीच्यावतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेश आजगावकर व नगरपालिकेचे नगराध्यक्ष शहा यांची भेट घेतली व त्यांनी यासंदर्भात कारवाई करण्याची विनंती केली.

 नगरपालिका क्षेत्रामध्ये पेट्रोल पंप नजीक त्याचप्रमाणे वेळूस याठिकाणी बेकायदेशीर  प्रमाणात मासे विक्री करण्यात येत आहे. नगरपालिकेच्या मार्केटमध्ये मासळी विक्री करणाऱया विपेत्याकडून नगरपालिका रोज सोपो कर वसूल करत आहे. असे असताना त्यांच्या समस्या वेळेत गांभीर्याने लक्ष देण्याची जबाबदारी नगरपालिका यंत्रणेची आहे. मात्र ही यंत्रणा पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला .

यावेळी मुख्याधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेत चार दिवसात या बेकायदेशीर मासे विक्री करणाऱया विरोधात नगरपालिकेने कारवाई करावी अन्यथा नगरपालिकेच्या इमारतीसमोर मासे विक्री करण्यात येणार असल्याचा इशारा दशरथ मांजरेकर यांनी यावेळी मुख्याधिकारी राजेश आजगावकर यांना दिला. यावेळी राजेश आजगावकर यांनी या संदर्भात आपण गांभीर्याने लक्ष देणार असून येणाऱया चार दिवसात यासंदर्भात त्वरित कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .त्यानंतर गट समिति व मासळी विक्री करणाऱया शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अख्तर शहा यांची भेट घेतली व त्यांना यासंदर्भात विशेष लक्ष देण्याची विनंती केली .त्यांनी आपण या संदर्भात गांभीर्याने लक्ष देणार असून यासंदर्भात सर्वेक्षण लवकर हाती घेणार असल्याची शहा यांनी स्पष्ट केले . नगरपालिकेच्या मासळी मार्केट मधील गैरसोयी संदर्भात शहा यांनी प्रत्यक्षपणे भेट देऊन या संदर्भातील पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे शहा यांनी यावेळी समितीच्या पदाधिकाऱयांना स्पष्ट केले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना गट समितीच्या पदाधिकाऱयांनी सांगितले की वाळपई मासळी मार्केटच्या गैरसोयी संदर्भात नगरपालिकेचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही. यामुळे या मासे विपेत्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना गांभीर्याने तोंड द्यावे लागत आहे. याबाबतच्या तक्रारी करूनही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. काँग्रेस गट समिती ही समस्या गांभीर्याने हाती घेणार असून जोपर्यंत त्यांची अडचण दूर होत नाही तोपर्यंत गप्प राहणार नसल्याचे सांगत चार दिवसांची मुदत नगरपालिकेला देण्यात आलेली आहे आहे .अन्यथा नगरपालिका इमारतीच्या समोर मासे विक्री सुरू करणार असल्याचे गट समितीने स्पष्ट केले आहे.

 

Related Stories

काणकोणातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करा

Omkar B

सुशांतसिंग मृत्यूप्रकरणाचे गोवा कनेक्शन उघड

Patil_p

ऊस शेतकऱयांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

Patil_p

पॅकेजच्या आधारे गोव्याला आत्मनिर्भर बनविणार

Omkar B

काणकोणच्या 2 मतदारसंघांतील निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

Patil_p

राज्यातील कायदा व्यवस्था ढासाळली

Patil_p
error: Content is protected !!