तरुण भारत

एनआयएप्रकरणी 6 फेबुवारीला सुनावणी

 पुणे / प्रतिनिधी :

एल्गार प्रकरणाची सुनावणी पुणे सत्र न्यायालयातून मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात हस्तांतरित करण्यात यावी. तसेच पुणे न्यायालयातील याप्रकरणातील सुनावणीची कागदपत्रे, दोषारोपपत्रे व इतर जप्त कागदपत्रे, पुरावे मुंबईत हलविण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने पुण्यातील विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात केली आहे.

Advertisements

याप्रकरणी पुढील सुनावणी पुणे न्यायालयात सहा फेब्रुवारी रोजी होणार आहे. एनआयएने न्यायालयात केलेला अर्ज न मिळाल्याने त्यावर म्हणणे मांडण्यास वेळ मिळावा, अशी मागणी बचाव पक्षांकडून सोमवारी करण्यात आली. तर या प्रकरणातील तपास अधिकाऱयांना न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे आणि सुनावणी मुंबईत घेण्याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे एनआयएच्या अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली.

Related Stories

सोलापूर जिल्ह्यात ३२५ जणांनी कोरोनाला हरविले

Abhijeet Shinde

साई जन्मभूमी वाद चिघळणार

prashant_c

जन्मदात्या मुलानेच मित्रांच्या मदतीने केला बापाचा खून

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये आज १७ रुग्णांची भर

Abhijeet Shinde

अवैध धंदेवाल्याशी पोलीसांनी सहभाग ठेवल्यास कारवाई – पोलीस अधीक्षक

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठ्यावर समिती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!