तरुण भारत

मका लागवड लाभदायक

जनावरांचे खाद्य ते उपफल निर्मितीत वाढता वापर : आधुनिक वाणांच्या वापराने भरघोस उत्पादन

मक्मयाची लागवड संबध जगभरात केली जाते. विकसित देशात मक्मयाची लागवड प्रामुख्याने जनावरांसाठीचे अन्न आणि इथेनॉलचा स्त्राsत म्हणून केली जाते, तर विकसनशिल देशात मक्मयाची लागवड धान्य म्हणून केली जाते. मक्मयापासून स्टार्च, इथेनॉल बनविले जाते. तसेच मक्मयावर स्टार्च बनविताना त्यापासून सॉर्बीटॉल, डेक्सट्राईन, सॉर्बीक असिड, लॅक्टकी असिड, बनविले जाते ज्यांचा वापर हा दैनंदिन जीवनात देखील दिसून येतो, जसे बिअर, आईस्क्रीम, शू-पॉलिश, सिरप, लिहण्याची शाई, फटाक्मयांची दारु, बॅटरी, सौंदर्य प्रसाधन यामध्ये होतो.

Advertisements

मक्मयाचा उगम झाला मॅक्सीकोमध्ये 7000 वर्षांपूर्वी मक्मयाची अमेरिका, मेक्सीको, दक्षिण आफ्रिका येथे लागवड होत होती. 15 व्या आणि 16 व्या शतकात ज्यावेळेस युरोपियन लोकांनी अमेरिकेशी संबंध प्रस्थापित केला. त्यानंतर युरोपियन लोक मका त्यांच्या प्रदेशात घेऊन आले आणि कालांतराने सबंध जगभरात मक्मयाची लागवड सुरु झाली. सन 2009 मध्ये सबंध जगभरात मक्मयाची 159 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर लागवड केली गेली होती. भारत जगातील सन 2012 च्या आकडय़ांनुसार 6 व्या क्रमांकाचा मका उत्पादक देश आहे. अमेरिका मक्मयाच्या उत्पादनात नंबर 1 देश असून त्यानंतर चीनचा क्रमांक आहे.

जमीन आणि हवामान

मका पिकांस 450 ते 600  मिमी पाऊस मानवतो. सर्वसाधरणपणे दर मिलीमिटर पावसाच्या पाठिमागे 15 किलो मक्मयाचे उत्पादन मिळते. असे आपण म्हणू शकतो. मक्मयाचे एक रोप त्याच्या जीवनात  250 लि. पाणी वापरते. मका पिकाच्या उगवणीसाठी जमिनीचे  16 ते 18 डिग्री तापमान योग्य ठरते. 20 डिग्री से.ला मका 5 ते 6 दिवसांत उगवून येतो. यापेक्षा जास्त जर जमिनीचे तापमान राहत असेल तर मात्र ते उगवणीसाठी हानीकारक ठरते.

मक्मयाच्या मुळय़ा

मका पिकांस तंतूमय मुळय़ा असतात. या हजारो मुळांना एकत्र करुन मोजल्यास त्यांची लांबी 150 मिटरपर्यंत भरु शकते. मक्मयाच्या मुळय़ा जमिनीत 1 मिटरपर्यंत खोल जातात. तर त्या 0.8 मीटरपर्यंत पसरतात. त्यामुळे उत्तमरित्या नरम, कडक न होणारी आणि पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होणारी जमीन मक्मयास मानवते.

बियाणे आणि लागवड

सर्वसाधरणपणे कोरडवाहू पिकापासून 24 क्विंटल उत्पादन मिळविण्यासाठी 1  एकरात मक्मयाची 11,251 रोप संख्या कायम राखावी. तर  32 ते 40  क्विंटल उत्पादन बागायती मक्मयापासून मिळविण्यासाठी एकरी रोपांची संख्या 18,518 राखावी. 40 क्विंटल पेक्षाजास्त उत्पादनासाठी एकरात 22,222 रोप संख्या राखावी.

मक्मयापासून हवे तसे उत्पादन मिळविण्यासाठी….

  1. मका पिकांस फुलोरापासून तर कणीस पक्व होईपर्यंत पाणी, नत्र, स्फुरद आणि पालाश कमी पडू नये.
  2. मक्मयाच्या कणसात कमीत कमी 30 ओळी, भरघोस भरलेले दाणे असलेले असे असावे. यासाठी बोरॉन देखिल कमी पडू नये. याठिकाणी 30 ओळी ह्या कमीत कमी गृहीत धरल्या आहेत, यापेक्षा जास्त ओळी असल्यास उत्पादनात नक्कीच वाढ होईल.
  3. एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवावी.

अन्नद्रव्य व्यवस्थापन…

पक्वतेच्या वेळेस मक्मयाचे एक रोप 8.7 ग्रॅम नायट्रोजन,5.1 ग्रॅम फॉस्फोरस आणि 4 ग्रॅम पालाश शोषून घेत असते. 1000 किलो मक्मयाच्या उत्पादनासाठी 15 ते 18 किलो नायट्रोजन, 2.5 ते 3.0 किलो फॉस्फोरस आणि 3 ते 4 किलो पालाशचा वापर होतो. मका पीक सी-4 गटातील प्रकाश संश्लंषण करणारे पीक आहे, या गटातील पिके हवेतील कार्बनडाय ऑक्साईड त्यांच्या शरिरात साठवून ठेवतात. मका इतर कोणत्याही पिकापेक्षा जास्तीत जास्त प्रमाणात प्रकाश संश्लेषण करु शकते. मका पिकांत स्टार्चचे प्रमाण जास्त असल्या कारणाने या पिकांस स्टार्च बनविण्याच्या प्रक्रियेत उपयोगी पडतील, अशी अन्नद्रव्ये फुलोरा काळापासून तर कणीस पक्व होईपर्यंत गरजेची आहेत.

मका पिकांस झिंक या सुक्ष्म अन्नद्रव्याची देखील जास्त गरज भासते. मका पिकांस खालीलप्रमाणे रासायनिक खतांतून अन्नद्रव्ये द्यावीत. प्रमाण किलो प्रती 1 एकर, शेतात लावण्यात येणाऱाया मक्मयाच्या कणसातील स्टार्च युक्त दाण्यांना बाजारात फारशी मागणी नसते. जनुकिय तंत्रज्ञानाचा वापर करुन, मक्मयाच्या दाण्यात स्टार्चऐवजी केवळ साखर तयार होईल, अशी योजना करुन स्विटकॉर्न ची निर्मिती केली गेली. काढणीस जास्त कालावधी लागल्यास स्विटकॉर्नमध्ये देखील मात्र साखरेचे रुपांतर स्टार्चमध्ये होते.

जमीन आणि हवामान

स्विटकॉर्नसाठी भुसभुसीत आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन मानवते. स्विटकॉर्न पीक मातीच्या दर्जानुसार वाढते, मात्र सामू 6.00 ते 6.5 असल्यास उत्तम पिक मिळते, उगवणीसाठी 20 ते 25  डिग्री सेल्सयीस तापमान योग्य ठरते, थंड वातावरणात लागवड करु नये, स्विटकॉर्नची लागवड करताना साधा मका, किंवा इतर दुस-या स्विटकॉर्न जातीच्या मक्मयाची 700 फुट अंतरापर्यंत लावड करु नये, तसेच दोघांचा फुलोरा एकाचवेळेस येईल अशा प्रकारे लागवड करु नये.

भानुदास कोंडेकर, बेळगाव

Related Stories

क्रेझ कॅम्पस इंटरव्हय़ूची

Patil_p

वाहतूक सुरक्षा महत्वाची

Patil_p

संकटमोचन रामभक्त हनुमान

Omkar B

महात्माजींचे महान विचार

Patil_p

‘बच्चे कंपनी’ रमली स्वयंपाकघरात

Omkar B

सामाजिक कार्याचा स्मरणसोहळा

Patil_p
error: Content is protected !!