तरुण भारत

U-19 विश्वचषक : पाकिस्तानला नमवून भारत अंतिम फेरीत

ऑनलाईन टीम  / पोटशेफस्ट्रूम : 

अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या शतकाच्या आणि दिव्यांश सक्सेनाच्या अर्धशतकाच्या जोरावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. जयस्वालने नाबाद 105 तर दिव्यांशने नाबाद 59 धावा केल्या.

दरम्यान, उपांत्य फेरीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे पाकिस्तानच्या संघाने 43 ओव्हरमध्ये केवळ 171 धावा केल्या.

पाकिस्तानकडून रोहेल नझीर 62, हैदर अली 56 तर मोहम्मद हॅरीसने 21 धावा केल्या. भारताच्या सुशांत मिश्राने 28 धावा देत तीन गडी बाद केले. कार्तिक त्यागी आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन तर अंकोलेकर आणि जयस्वालने प्रत्येकी एक गडी बाद केला.

 

Related Stories

जेएनयू : सुरक्षेच्या मागणीवर हायकोर्टाची व्हॉट्सऍप, गूगल, पोलिसांना नोटीस

prashant_c

बीएस-4 वाहनांच्या विक्री-नोंदणीच्या सवलतीसाठी फाडाकडून याचिका सादर

tarunbharat

देशात 38,772 बाधित; 443 मृत्यू

datta jadhav

6 दिवसांत आयुर्वेदिक औषधाने कोरोनामुक्त

Patil_p

अमेरिकेत हिंसाचार सुरूच; 17 शहरातून 1400 जणांना अटक

datta jadhav

पाकिस्तान मधून 2 भारतीय उच्चायुक्त गायब; मोदी सरकारने विचारला सवाल

pradnya p
error: Content is protected !!