तरुण भारत

मोक्का न्यायालयाकडून तेलनाडे बंधू फरार घोषित

प्रतिनिधी / इचलकरंजी

येथील डबल मोक्कांतर्गत कारवाई झालेला ‘एसटी सरकार’ टोळीचा म्होरक्या, नगरसेवक संजय तेलनाडे व त्याचा भाऊ सुनील तेलनाडे या दोघांना मंगळवारी मोक्का विशेष न्यायालयाने  फरार घोषित केले आहे. 16 मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.

Advertisements

 तेलनाडे टोळीवर खंडणी, सामूहिक बलात्कार, बेकायदेशीर जागा बळकावणे, खून यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीविरोधात डबल मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. दोषारोपपत्रही मोका न्यायालयात दाखल केले आहे. मागील दहा तेलनाडे बंधू फरारी आहेत.  शहापूर पोलीस ठाण्यात 16 मे 2019 रोजी नरेंद्र सुरेश भोरे यांनी तेलनाडे बंधूंविरोधात खंडणाप्रकरणी तक्रार दिली होती.  तेलनाडे बंधू व वकील उपाध्ये याच्यासह 13 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता.  तेलनाडे बंधूनी कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिका फेटाळून लावत न्यायालयाने दोघांना तपासी अधिकाऱयांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. आता  तेलनाडे बंधूंना मोक्का न्यायालयाने फरार घोषित केले आहे. 16 मार्चनंतर त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहितीही पोलीस उपाधीक्षक बिरादार यांनी दिली.

Related Stories

चार वर्षाच्या चिमुकलीचा लैंगिक अत्याचार करून खून

Abhijeet Shinde

कोल्हापूर : घटस्थापनेच्या दिवशीच पुजाऱ्यावर काळाचा घाला

Abhijeet Shinde

वीस टक्के कोरोनाबाधितांचा हृदयविकाराने मृत्यू

Abhijeet Shinde

मृत्युनंतर ‘त्याने’ फेडले आई-वडिलांचे कर्ज !

Abhijeet Shinde

कोल्हापूर : केंद्र शासनाने सॉफ्टलोनऐवजी ऊसाला प्रतिटन ५०० ते ६०० रु. अनुदान द्यावे

Abhijeet Shinde

बांबवडेत आत्महत्येचा प्रयत्न फसलेल्या तरुणाची अखेर आत्महत्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!