तरुण भारत

जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र विद्यापीठाकडे सुपूर्द

प्रतिनिधी / कोल्हापूर

राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांचे संस्कार आणि प्रेरणा यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. जिजाउ मासाहेबांच्या मार्गदर्शनामुळेच देशाला शिवछत्रपतींसारखा युगपुरूष लाभला. या दोघांचेही महात्म्य अधोरेखित करणारे तैलचित्र शिवाजी विद्यापीठाला प्रदान करताना होणारा आनंद अवर्णनीय आहे, असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आज येथे काढले.

Advertisements

अखिल भारतीय मराठा महासंघ आणि शिवभक्त लोकआंदोलन समितीच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात (दीक्षांत सभागृह) लावण्यासाठी राजमाता जिजाऊ आणि शिवराय यांची चित्रकृती मंगळवारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. ‘शिवरायांची कीर्ती सांगे, आईच माझा गुरू’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित चित्रकृती ज्येष्ठ चित्रकार जे. बी. सुतार यांनी रेखाटले होते.

यावेळी इंद्रजीत सावंत म्हणाले, जिजाऊंचे शिवरायांना घडविण्यातील योगदान  या तैलचित्रामुळे विद्यार्थ्यांसमोर येत राहीलच; शिवाय, महाराजांप्रमाणे कर्तबगारी गाजविण्याची प्रेरणाही देत राहील, अशी भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी हे तैलचित्र विद्यापीठाकडे सुपूर्द केल्याबद्दल आभार व्यक्त केले. शिवरायांच्या जडणघडणीत जिजाउ मासाहेबांचा मोलाचा वाटा आहे. हे दर्शविणारे तैलचित्र जे.बी. सुतार यांनी रेखाटले आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक आणि बारकाव्यांनिशी अत्यंत जिवंत वाटाव्यात, अशा व्यक्तीरेखा रेखाटल्या आहेत. या तैलचित्राला राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात लावून योग्य तो सन्मान केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. गिरीष कुलकर्णी यांच्यासह इतिहास संशोधक गणेश नेर्लेकर-देसाई, शशिकांत पाटील, शंकरराव शेळके, शैलजा भोसले, प्रकाश पाटील, प्रताप नाईक, इंद्रजीत माने, अवधूत पाटील, शरद साळुंखे, कृष्णाजी हरुगडे, गुरुदास जाधव आदी उपस्थित होते.

Related Stories

फडणवीस सरकारने पाच वर्षे केवळ अभ्यास केला

Abhijeet Shinde

करवीर तालुक्यात ६६ गावात होणार खुल्या प्रवर्गातील सरपंच

Abhijeet Shinde

बेकायदेशीर बायोडिझेलची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

गुजरी कॉर्नर, वसंत मेडिकलजवळ उभारणार तात्पुरता उड्डाणपूल

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहरात दुर्गामूर्तीचे उत्साहात स्वागत

Abhijeet Shinde

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान अप्पालाल शेख यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!