तरुण भारत

स्वामी स्वरुपानंदजी यांची 7 पासून फोंडय़ात प्रवचने

प्रतिनिधी/ फोंडा

चिन्मय मिशन फोंडा केंद्रातर्फे येत्या 7 ते 11 फेब्रु. दरम्यान भवगद्गीतेच्या कर्मयोग या तिसऱया अध्यायावर ज्ञानयज्ञ आयोजित करण्यात आला आहे. चिन्मय मिशनचे विश्व प्रमुख स्वामी स्वरुपानंदजी हे ‘कर्मयोग’ या विषयावर हिंदीतून प्रवचने देणार आहे. फोंडा येथील क्रांती मैदानावर सायं. 6.30 ते रात्री 8 वा. यावेळेत ही प्रवचने होणार आहेत.

Advertisements

चिन्मय मिशन फोंडा केंद्राचे अध्यक्ष संदीप निगळय़े यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी केंद्राचे आचार्य स्वामी सुघोषानंदजी, सचिव गौरी नायक व खजिनदार शांती कामत हे उपस्थित होते. पाच दिवस चालणाऱया या ज्ञानयज्ञात स्वामी स्वरुपानंदजी हे ‘तणावमुक्त सफलता’ या विषयावर आपल्या रसाळ वाणीतून निरुपण करणार आहे. गेली 28 वर्षे चिन्मय मिशनतर्फे हा ज्ञान यज्ञ आयोजित केला जात असून यंदा हे 29 वे वर्ष आहे.

या कार्यक्रमाव्यतिरिक्त 9 फेब्रु. रोजी सकाळी 10 वा. लहान मुलांसाठी बालमेळावा, 11 वा. पालकांसाठी प्रभावी पालकत्व या विषयावर मार्गदर्शन व सायं. 4.30 वा. वयवर्षे 18 ते 28 वयोगटातील युवकांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. खडपाबांध येथील चिन्मय आराधना आश्रमात ही तिनही सत्रे होणार असून त्यात स्वामी स्वरुपानंदजी हे मार्गदर्शन करतील, अशी माहिती स्वामी सुघोषानंद यांनी दिली.

स्वामी स्वरुपानंदजी यांनी पवई मुंबई येथील चिन्मय मिशनच्या आश्रमात राहून स्वामी तेजोमयानंदजी यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांताचे अध्ययन पूर्ण केले आहे. चिन्मय मिशनच्या ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम, मध्य पूर्व आदी विभागाचे प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. देश विदेशातील अनेक औद्योगिक आस्थापनामध्ये त्यांची व्याख्याने झाली आहेत. आध्यात्मिक विषयावर त्यांनी प्रभावी लिखाण केले असून बरीच पुस्तके त्यांच्या नावावर प्रकाशित झालेली आहे.

Related Stories

राज्य कार्यकारिणी बैठकीत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव

Patil_p

पर्यटनाच्या संर्वधनासाठी पर्यटन धोरण तयार करणार

Patil_p

तीस दिवसांत 57.60 लाखांचा ड्रग्ज जप्त

Patil_p

विहिरीत उडी मारून वृद्धाची आत्महत्या

Omkar B

मेथर खूनप्रकरणातील पाचव्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या

Patil_p

संगीत हे शाश्वत, चिरकाल आनंद देणारे !

Patil_p
error: Content is protected !!