तरुण भारत

मार्च अखेरपर्यत साडेआठ कोटी घरपट्टी वसुल करण्याचे उद्दिष्ट

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने क्यापारी संकुलातील गाळेधारकांकडील थकीत भाडे वसुल करण्याचा सपाटा महापालिकेने सुरू केला आहे. तसेच शहरातील मालमत्ताधारकांकडून 40 कोटी घरपट्टी वसुल करण्याचे उद्दिष्ट असून यापैकी 31 कोटी50 लाख रूपये घरपट्टी जमा करण्यात आली आहे. उर्वरीत घरपट्टी जमा करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisements

 महापालिकेला मिळणाऱया घरपट्टीसह विविध शुल्काच्या रक्कमेतून स्वच्छता कामे आणि पथदीप देखभाल, उद्यान देखभाल, वाहनचालकांचे वेतन देणे बंधनकारक आहे. यामुळे महसूल वसुलीशिवाय पर्याय नाही. यंदा 40 कोटी घरपट्टी वसुल करण्याचे मनपाचे उद्दीष्ट आहे. आतापर्यंत शहरातील मालमत्ताधारकांनी 31 कोटी 50 लाखाची घरपट्टी भरली आहे. यामुळे आणखीन साडेआठ कोटी मार्च अखेर पर्यंत वसुल करण्याचे उद्दीष्ट मनपाच्या महसूल विभागासमोर आहे. 13 कोटीची घरपट्टी जमा होऊन देखील मनपाच्या खजिन्यात ठणठणाट आहे. स्वच्छता कामगार, पथदीप देखभाल करणारे कंत्राटदार तसेच माळी, वाहनचालकांचे वेतन अदा करण्यातच मिळालेले उत्पन्न खर्ची गेले आहे.विकासकामे राबविण्यासाठी मनपाकडे निधी नसल्याने मोठी पंचाईत झाली असून नागरिकांच्या नागरी सुविधाबाबतच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी निधीची चणचण भासत आहे. यामुळे व्यापारी संकुलातील भाडे वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पण यावर अवलंबून न राहता घरपट्टी वसुल करण्यात यावी अशी सूचना महापालिका आयुक्तांनी केली असल्याने घरपट्टी वसुलीची मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

थकलेली साडेआठ कोटीची घरपट्टी वसुल करण्यासाठी मोहीम राबविण्याची  सुचना महापालिका आयुक्तानी मनपाच्या महसूल विभागाच्या अधिकाऱयांना केली आहे.  मनपाच्या उद्दीष्टानुसार साडेआठ कोटीची घरपट्टी मार्च अखेर पर्यंत वसूल करणे बंधनकारक आहे. पण मागील वर्षीपासून घरपट्टी भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे. यंदा जास्ती रक्कम वसूल होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना संपर्क साधून घरपट्टी वसूल करण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी महसूल विभागला केली आहे. यामुळे आता घरपट्टी वसुली मोहीम तीव्रपणे राबविण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. घरपट्टी भरणा न केलेल्या मालमत्ताधारकांच्या घरी मनपाचे कर्मचारी जाणार आहेत. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

 

Related Stories

‘त्या’ विद्यार्थ्यांची विनंती आम्हाला घरी पाठवा

Patil_p

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री सुरेश कुमार आज खानापूर दौऱयावर

Amit Kulkarni

आर्ट्स सर्कलच्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

Amit Kulkarni

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संशयितांचा मस्तवालपणा

Patil_p

आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

Rohan_P

स्वयंस्फूर्तीने कडकडीत लॉकडाऊन

Patil_p
error: Content is protected !!