तरुण भारत

शिवानी सुर्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

ऑनलाईन टीम / पुणे :

प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सुर्वेला नुकताच सिटी सिने अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट ‘डेब्युटंट अभिनेत्री’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाचा हा शिवानीचा चौथा पुरस्कार आहे.

Advertisements

महाराष्ट्राचा फेवरेट कोण ह्या पुरस्कार सोहळय़ात ‘पॉप्युलर फेस ऑफ दि इयर’, आणि ‘महाराष्ट्राची फेवरेट डेब्युटंट अभिनेत्री’ असे दोन पुरस्कार शिवानीला मिळाले होते. त्यापाठोपाठच व्हिएतनाममध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळय़ात तिच्या ‘जाना ना दिल से दूर’ ह्या हिंदी मालिकेतल्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आणि आता सिटी सिने अवॉर्ड्समध्ये शिवानीला सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्रीचा पुरस्कार स्विकारल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेत्री शिवानी सुर्वे म्हणाली, ह्या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय मी माझ्या चाहत्यांना देऊ इच्छिते. मी फक्त माझ्या ट्रिपल सीटमधल्या भूमिकेवर मेहनत केली होती. पण माझ्या चाहत्यांनी मला सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्री बनवण्यासाठी भरघोस मतदान केले नसते. तर आज हा पुरस्कार मला मिळाला नसता. त्यामुळे मी माझ्या चाहत्यांची ऋणी आहे.

Related Stories

एनसीबीकडून दीपिका पादुकोण, सारा अली खान यांना समन्स

pradnya p

झोंबिंवर आधारित पहिला मराठी चित्रपट झोंबिवली

Patil_p

वजनदार डान्सिंग क्वीनची बॅकस्टोरी

Patil_p

‘रामसेतू’त अक्की-जॅकीची जोडी

Amit Kulkarni

प्रथमच मालिकेत बोलक्या बाहुल्यांचा प्रयोग

Patil_p

फुलवा खामकर रमली आठवणींच्या खजिन्यात!

Patil_p
error: Content is protected !!