तरुण भारत

अयोध्येतील राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या उभारणीसाठी सरकारने 67 एकर जमीन या समितीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत दिली.

Advertisements

आज सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अयोध्येतील राम मंदिर उभारणीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यानंतर लोकसभेत पंतप्रधान मोदींनी यासंर्भातील घोषणा केली.

मोदी म्हणाले, अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. राममंदिराची निर्मिती आणि त्याच्यासंबंधीचे निर्णय घेण्यासाठी या समितीला स्वायत्तता असेल. अयोध्येत प्रभू रामांचे भव्य दिव्य असे मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी योजना आखण्यात आली असून, सरकारने 67 एकर जमीन या समितीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्याची सूचना ऊत्तर प्रदेश सरकारला करण्यात आली आहे, असेही मोदींनी सांगितले.

Related Stories

पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय मागे ; ठाकरे सरकारचा निर्णय

Abhijeet Shinde

भारतात मागील 24 तासात 73,272 नवे कोरोना रुग्ण; 926 मृत्यू

datta jadhav

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8369 नवे कोरोना रुग्ण; 246 मृत्यू

Rohan_P

वाहतुकीच्या समस्येवर पोलिसांची अंधार भेदून पार पडली पनवेल संघर्षसोबत बैठक

Abhijeet Shinde

राज्यातील आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ : राजेश टोपे

Rohan_P

भारतात 89,706 नवे कोरोना रुग्ण; एकूण रूग्णसंख्या 43.70 लाखांवर

datta jadhav
error: Content is protected !!