तरुण भारत

नोकरीच्या मागे न लागता मोठे उद्योजक बना

प्रतिनिधी / सांगली  :

    तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बना. येणाऱ्या संधीचं सोनं करून आत्मविश्वास, अचूक निरीक्षण आणि जिद्दीच्या जोरावर ती तुम्ही मोठे उद्योजक होऊ शकता असे प्रतिपादन श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय, इंक्युबेशन सेंटर तर्फे आयोजित कार्यक्रमात प्रकट मुलाखतीत प्रीतम हायटेक प्रा.ली.चे संस्थापक प्रकाश शाह यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुजराती सेवा समाजाचे अध्यक्ष कांतिभाई वामजा हे उपस्थित होते.

Advertisements

    या प्रसंगी उद्योजक प्रकाश शाह यांनी माझा प्रवास च्या अनुषंगाने उद्योजकतेत टीकायचे असेल तर प्रचंड परिश्रम, कष्ट, मेहनत, जिद्द आणि जबरदस्त आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही मोठे उद्योजक बनू शकता. कोणत्याही कामाला, कार्याला कमी लेखू नका, व्यवसायात यायचे असेल तर अनुभव हा सर्वात मोठा गुरू मानून धाडस करा, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही निश्चित उद्योजक होऊ शकाल असे आवाहन प्रकट मुलाखतीतून त्यांनी केले.

यावेळी कांतिभाई वामजा यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना शिस्त, जिद्द आणि नियोजन या त्रिवेणी संगमातून तुम्ही निश्चित यशस्वी बनण्याचे स्वप्न साकार करा असे आवाहन केले. याप्रसंगी प्रकट मुलाखत. स्वप्निल शाह व प्रा. श्रीमती जे. एस. मुजावर यांनी प्रकाश शहा यांना विविध प्रश्नातून बोलके करून उद्योजकतेचा प्रवास सहजतेने विद्यार्थिनी पर्यंत पोहोचवला.

   याप्रसंगी संस्थेचे सचिव. दीपक भाई शाह, महाविद्यालय विकास समितीचे निमंत्रित सदस्य स्वप्निल शाह आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पवार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीमती अर्चना सूर्यवंशी यांनी केला तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीमती एस. एस. दुर्गुळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनिता खडसे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Stories

कोल्हापूर : मासा बेलेवाडीतील गणेश विसर्जनाची अनेक वर्षांची परंपरा खंडीत

Abhijeet Shinde

शेट्टी-खोत यांनी सेटलमेंट करुन शेतकऱ्यांना फसवले : रघुनाथदादा पाटील

Abhijeet Shinde

कोगिल बुद्रुक येथे गव्यांचा कळप; शेतकरी वर्ग धास्तावला

Sumit Tambekar

अवैध दारुची विक्री करताना इचलकरंजीच्या माजी नगरसेवकासह तिघांना अटक

Abhijeet Shinde

सीपीआरमध्ये बालकावर दुर्बिणीद्वारे हृदय शस्त्रक्रिया

Abhijeet Shinde

सांगली : जतच्या ६५ गावांची योजना अडीच वर्षात मार्गी लावू : मंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!