तरुण भारत

शोभती जैशा दिव्य योगिनी

जिवशिवांना ज्याप्रमाणे वडीलकीचा मान असतो त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या वऱहाडाच्या त्या मिरवणुकीत वसुदेव व उग्रसेन यांचे रथ चालले होते. त्यानंतर बलरामदादांचा रथ होता. बलरामदादा संतोषाने याचकांच्या इच्छा पूर्ण करीत चालला होता. कुणाला काही दिले, कुणाला अनंत सुख दिले तर कुणाला तो चिद्रत्नांचे अलंकार देत होता. त्यामुळे याचक सुखी होत होते. कृष्णाची माता देवकी मेण्यातून चालली होती. ती जणू सात्त्विकता व वत्सलता यांची मूर्ती होती. बलरामाची पत्नी रेवती व कृष्ण भगिनी सुभद्रा स्त्री समुदायात उठून दिसत होत्या. श्रद्धा आणि शांती जणू त्यांच्या रूपाने मूर्त होऊन आल्या होत्या. गद, उद्धव, सात्यकी, अक्रूर हेही वऱहाडात चालले होते.

फळ समीप आलें देखा । ऐसें जाणवलें भिमका। तो सावधान अतीनेटका । भावें बैसका घातली। साउमा येऊनि आपण। वसुदेवादि उग्रसेन। नमस्कारूनि संकर्षण। भीतरिं जाण आणिलें। विचित्र घातलीं आसनें । सुकुमार मृदुपणें । गाद्या पडगाद्या टेंकणें। वोठंगणें मृदोळिया। भीतरें आलिया वऱहाडिणी। शोभती जैशा दिव्य योगिनी। फळ मांडिलें विस्तारोनी। भावे रुक्मिणी हरिखेली। पीठ स्थापिलें कुसरिं । शृंगारोनियां नोवरी । वेगें आणिली बाहेरी । मंत्रोच्चारिं द्विजवरिं ।

Advertisements

कृष्णाचे वऱहाड जवळ आले आहे हे जाणून भीष्मक राजाने त्यांच्या आसनांची तातडीने व्यवस्था केली. तो स्वतः वऱहाडाला सामोरा गेला. वसुदेव, उग्रसेन व बलरामदादा यांना त्याने नमस्कार केला आणि सन्मानाने त्यांना विवाह मंडपात आणले. गाद्या, लोड आणि विविध प्रकारची आसने वऱहाडी मंडळीसाठी सज्ज करण्यात आली होती. आत आलेल्या वऱहाडणी जणू दिव्य योगिनींप्रमाणे सुंदर दिसत होत्या. आता नवरीला सजवून मंडपात आणा अशी सूचना मंत्रघोषात पुरोहितांनी
केली.

पाहतां भीमकीचें रुपडें। अरूपरूपें तेज गाढें। मंडपामाजी उजियेड पडे । आणिकेकडे पाहों नेदी ।

नानारूपाचेनि प्रकाशें। अवघी भीमकीच भासे । देखोनि जीव भुलले कैसे। डोळियां पिसें लाविलें। उभवूनि स्वरुपठसा। भुलविलें आदिपुरुषा। एकाएकीं धांविन्नला कैसा । कृष्ण पिसा इणें केला। कृष्ण शहाणपणें अतिगाढा । तोही भीमकिया केला वेडा। वोढूनि नेला आपुलेकडा । दुजें पडिपाडा इसी नाहीं। भीमकी लावण्याची राशी । कृष्णरूपा भाळली कैसी। सांडूनि जातिकुळासी । कृष्णरूपासी निवटली। भीमकी कृष्णायोग्य सहजें । कृष्णवर इसींच साजे। यासारिखें न देखें दुजें । बोलों लाजिजें बोलतां । पाहतां भीमकीची रूपरेखा । टक पडिलें सकळिकां। कृष्ण पारखी गे निका । जोडा नेटका मेळविला । गोरेपणें अतिसुंदर । विशाळ नयन भाळ थोर । अंगें सर्वांग सुकुमार । मनोहर उभारा । कृष्ण साधावया निधान । नेत्री। सूदलें अंजन । पाहतां भीमकीचें वदन। विकल्प मन करूं नेणे ।

Ad.  देवदत्त परुळेकर

Related Stories

नवीन शैक्षणिक धोरणाची वर्षपूर्ती!

Patil_p

ये मन है – 2

Omkar B

अर्थव्यवस्था सुधारण्याचा संकेत

Patil_p

व्यवस्थापकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची

Patil_p

दंडमुंडन ते कल्याण त्यासी

Patil_p

सायकल आणि पोलीस

Patil_p
error: Content is protected !!