तरुण भारत

मोटार सायकल चोरी प्रकरणी युवकाला अटक

पोलीस कोठडीत घेऊन केली चौकशी

प्रतिनिधी \ बेळगाव

Advertisements

गेल्या वषी खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात मोटार सायकल चोरी प्रकरणी पोलिसांनी अष्टे (ता. बेळगाव) येथील एका युवकाला बुधवारी अटक केली आहे. पोलीस कोठडीत घेऊन ही कारवाई करण्यात आली.

इरण्णा सुरेश मुलीमनी (वय 30, मुळचा रा. अष्टे, सध्या रा. हण्णिकेरी, ता. बैलहोंगल) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक धिरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी न्यायालयाची परवानगी घेऊन बुधवारी त्याला एक दिवसासाठी पोलीस कोठडीत घेतले.

दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार एप्रिल 2019 मध्ये खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात मोटार सायकलची चोरी झाली होती. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले होते. तीन महिन्यांपूर्वी इरण्णा सौंदत्ती पोलीसांच्या जाळय़ात अडकला. त्याने बेळगावात मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करुन त्याची चौकशी केली.

Related Stories

दुसऱया आठवडय़ातही विकेंड कर्फ्यू

Patil_p

आंबेवाडी येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Patil_p

खानापूर पोलिसांकडून चोरटी दारू विकणाऱयाला

Patil_p

महापूर-कोरोना विरोधात लढण्यासाठी प्रशासन सज्ज

Patil_p

कर्नाटक: टिकेनंतर टीपू सुल्तानचा ७ वी च्या अभ्यासक्रमात पुन्हा समावेश

Abhijeet Shinde

बसस्थानकाच्या कामाला कधी गती येणार?

Amit Kulkarni
error: Content is protected !!