तरुण भारत

अनगोळ येथील महिला बेपत्ता

उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी \ बेळगाव

Advertisements

झटपट कॉलनी इंदिरानगर, अनगोळ येथील एक महिला गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या पतीने उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

दीपा कल्याण पडगानूर (वय 38) असे तिचे नाव आहे. ती लॅब टेक्नीशन म्हणून काम करते. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजता कामावर जाण्याचे सांगुन ती घराबाहेर पडली होती. ती अद्याप घरी परतली नाही. पती कल्याण पडगानूर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

5.6 फूट उंची, अंगाने सुदृढ, गोल चेहरा, गहू वर्ण असे तिचे वर्णन आहे. ती कन्नड  व हिंदी भाषा बोलते. घराबाहेर पडताना या महिलेने निळे टॉप व काळी लेगींज परिधान केली होती. या महिले विषयी कोणाला माहिती असल्यास 0831-2405238 या क्रमांकावर उद्यमबाग पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

निकालाबाबत उलटसुलट तर्कवितर्क

Amit Kulkarni

बी.आर.आंबेडकरनगर कमानीचे उचगावला भूमिपूजन

Amit Kulkarni

अनधिकृत वसाहतींवर बुडाकडून कारवाई

Amit Kulkarni

पेटीबंद उमेदवारांचे आज ठरणार भवितव्य

Patil_p

यंदाचा गळीत हंगाम एक महिना उशिरा

Amit Kulkarni

अवघे गर्जे कपिलेश्वर….!

Amit Kulkarni
error: Content is protected !!