तरुण भारत

मोटार सायकल अपघातात देवगिरी येथील तरुण ठार

 प्रतिनिधी \ बेळगाव

भरधाव मोटार सायकल झाडावर आदळून देवगिरी (ता. बेळगाव) येथील एक तरुण ठार झाला. मंगळवारी रात्री देवगिरीहून बेन्नाळीला जाताना ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.

Advertisements

वजीर सुरेश कुंबरगी (वय 27, रा. देवगिरी) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. केए 22 एचबी 7120 या मोटार सायकलवरुन बेन्नाळीकडे जाताना ही घटना घडली आहे. या अपघातात त्याच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्याचे वडील सुरेश कुंबरगी यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी हे पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

जैविक संवर्धनांतर्गत वृक्षारोपण-तलाव विकासाला प्राधान्य

Amit Kulkarni

शास्त्रीनगर येथील गटारी स्वच्छ करा

Amit Kulkarni

बाजारपेठेतील गर्दीमुळे धोक्याचा इशारा

Patil_p

महालक्ष्मी मंदिराचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन

Amit Kulkarni

कलाश्री बंब लकी ड्रॉ सोडतचे नारायण मुचंडीकर दुचाकी विजेते

Amit Kulkarni

एक्सेस इलाईट हुबळी, साईराज हुबळी टायगर्स संघांची विजयी सलामी

Patil_p
error: Content is protected !!