तरुण भारत

अनगोळ दगडफेक प्रकरणी तीन एफआयआर

पोलीस वाहनांवरही दगडफेक, सहा जखमींवर सिव्हिलमध्ये उपचार

प्रतिनिधी \ बेळगाव

Advertisements

मंगळवारी रात्री अनगोळ येथे झालेली हाणामारी व दगडफेक प्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी बुधवारी रात्रीपर्यंत चौघा जणांना अटक झाली आहे. पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली असून यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दगडफेकीत जखमी झालेल्या सहा जणांवर मंगळवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. विक्रम भोसले (वय 28), विशाल कंग्राळकर (वय 23), चेतन सायनाक (वय 28), नागेश पाटील (वय 24), आकाश झंगरुचे (वय 23), सुरज बिर्जे (वय 29) अशी त्यांची नावे आहेत.

ग्रामदेवता मरगाई देवीच्या यात्रेनिमित्त झालेल्या मिरवणुकीत वादावादी होऊन नंतर त्याचे पर्यावसान हाणामारीत व दगडफेकीत झाले होते. खडेबाजारचे एसीपी चंद्राप्पा, टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांच्यासह शहरातील बहुतेक अधिकाऱयांनी मंगळवारी रात्री उशीरापर्यंत अनगोळ परिसरात ठाण मांडून होते.

हवालदार चिन्नस्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस वाहनांवर दगडफेक केल्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर सुरज बिर्जे या तरुणाने सातहून अधिक जणांवर फिर्याद दिली आहे. आकाश झंगरुचे या तरुणाने 17 हून अधिक जणांवर फिर्याद दिल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

घरांवर दगडफेक करण्यात आली असून लहान मुलेही जखमी झाली आहेत. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या संबंधी बुधवारी रात्री टिळकवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता दगडफेक प्रकरणी अटक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

सुपारी देऊन पत्नीचा खून? निपाणीतील घटना : पतीसह चौघे ताब्यात

Patil_p

वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये जुंपले

Amit Kulkarni

जादा पाण्यासाठी पंप जोडणीचे काम युद्धपातळीवर

Patil_p

एसडीएम ए धारवाड संघ फर्स्ट डिव्हीजन चषकाचा मानकरी

Amit Kulkarni

सकाळी गलगलाट; दुपारी शुकशुकाट

Amit Kulkarni

प्रलंबित विकासकामे दिवाळीनंतर पूर्ण करा

Omkar B
error: Content is protected !!