तरुण भारत

कला आयुष्यभर आनंदित ठेवते

बेळगाव  / प्रतिनिधी

माणसाला अंगिभूत असणारी कला आयुष्यभर आनंदित ठेवत असते. त्यामुळे आपल्यामध्ये असणाऱया कलागुणांना इतरांसमोर आणण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात. अशा स्पर्धांमध्ये प्रत्येक युवकाने भाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आरपीडी कॉलेजच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या उपाध्यक्ष बिंबा नाडकर्णी यांनी केले.

आरपीडी कॉलेज ऑफ आर्ट्स ऍण्ड कॉमर्स कॉलेजच्या कल्चरल असोसिएशनच्यावतीने बुधवारपासून दोन दिवसीय ‘हेरिटेज 2020’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपिठावर प्राचार्य डॉ. अचला देसाई, कॉमर्स विभागप्रमुख एस. एस. शिंदे, बीबीएचे संचालक आर. व्ही. भट, कल्चरल असोसिएशनचे प्रमुख एच. बी. कोलकार, जनरल सेपेटरी ऐश्वर्या होसूर, विद्यार्थीनी प्रतिनिधी वाणी चिन्नाप्पगौडर यासह इतर उपस्थित होते.

यावेळी प्राचार्या डॉ. अचला देसाई म्हणाल्या, सध्याच्या युवापिढीकडून समाजाच्या फार मोठय़ा अपेक्षा आहेत. त्यामुळे आपल्या कलागुणांना वाट मोकळी करून देण्यासाठी असे कार्यक्रम महत्त्वाचे असतात. ‘कोई जितता है, पण सब सिखते है’ असे म्हणत त्यांनी हरूनसुद्धा खूप काही शिकता येते, असे सांगितले.

दोन दिवसीय या स्पर्धांमध्ये साहित्य, छायाचित्र, भाषण, कला – कौशल्य, चाणक्मय, नवरंग, वॉक ऑफ हेरीटेज या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांन ट्राफीचे अनावरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी पाटील व देवयानी शहापूरकर यांनी केले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

 

Related Stories

कारवार जिल्हय़ातील मतमोजणी रात्री उशिरापर्यंत

Omkar B

22 पासून महाराष्ट्रासाठी कर्नाटकातून बससेवा

Patil_p

सामाजिक अंतर राखत साजरी झाली बकरी ईद

Patil_p

रोगवाढीमुळे ऊस उत्पादकात वाढली चिंता

Patil_p

मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी

Amit Kulkarni

हिंडलगा श्री महालक्ष्मी यात्रेला जिल्हाधिकाऱयांचा हिरवा कंदिल

Amit Kulkarni
error: Content is protected !!