25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

… तर 370 कलम, तिहेरी तलाक रद्द झालं नसतं : नरेंद्र मोदी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवदेन केलं. मोदी म्हणाले, राष्ट्रपतींच भाषण देशाला दिशा देणारं होत. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून नव्या भारत देशाचे चित्रं उभं केले आहे.

देशाच्या प्रगतीसाठी आमच्या सरकारचे प्रयत्न चालू आहेत. आम्ही जर जुन्या मार्गाने गेलो असतो तर देशात प्रगती झाली नसती. 370 कलम, तिहेरी तलाक रद्द झालं नसतं. राम जन्मभूमीवर मंदिर झालं नसतं, असं सांगत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिल्यानंतर लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर काँग्रेस आणि इतर खासदारांनी महात्मा गांधी झिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यानंतर काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांनी हा तर फक्त टेलर आहे, असे मोदींना म्हटले. त्यावर मोदींनी तत्काळ, तुमच्यासाठी गांधीजी टेलर असतील, आमच्यासाठी मात्र जीवन आहेत, असे उत्तर दिले.

 

 

Related Stories

अयोध्येत राममंदिराच्या कामाला सुरुवात; खोदकामावेळी सापडल्या पुरातन मूर्ती

datta jadhav

शौर्य चमकणार, विस्तारवादाचा अस्त!

Patil_p

अयोध्येतील मशिदीचा आराखडा सादर

Patil_p

नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्यासाठी रणरागिणी मैदानात

datta jadhav

शेतकरी संघटनांशी पुन्हा मंगळवारी चर्चा

Patil_p

भूमी अधिग्रहणाच्या विरोधात दगडफेक

Patil_p
error: Content is protected !!